top of page

मुखपृष्ठकथा


शास्त्रज्ञांचे मूल्यमापन आणिदिशाभूल करणारी मोजमापं
डॉ. किशोर पाकणीकर आज विज्ञानाविषयी बोलताना आपण वारंवार आकड्यांचा आधार घेतो—“अमुक शास्त्रज्ञाने किती शोधनि बंध प्रकाशित केले?”, “त्यांच्या लेखांना किती citation मिळाले?”, “त्यांच्या नावावर किती पेटंट्स आहेत?”—अशा प्रश्नांवरूनच आपण बहुतेक वेळा त्या व्यक्तीची उंची ठरवतो. आकडे सोपे असतात; एका नजरेत निर्णय होतो आणि चर्चा झटपट संपते. म्हणूनच विद्यापीठे, निधी देणाऱ्या संस्था, सरकार आणि माध्यमे या आकड्यांना फार वजन देतात. मात्र विज्ञानाची खरी ताकद इतक्या सरळ चौकटीत मावते का? एखाद्या


वनस्पतीही बोलतात: डॉ (सर) जगदीशचंद्र बोस यांच्या जैवभौतिक संशोधनाची अद्भुत कहाणी
डॉ सतीश जी कुलकर्णी क्रेस्कोग्राफपासून आधुनिक प्लांट नुरोबियॉलॉजिपर्यंतचा विज्ञानाचा रोमांचकारी प्रवास आपल्या आजूबाजूला रोज असंख्य झाडे उभी असतात - मोठी झाडे, फुलझाडे, गवत, वेल, छोट्या कोवळ्या रोपांची गर्दी. आपण त्यांना पाहतो, त्यांची सावली घेतो, त्यांच्याकडे सौंदर्य म्हणून पाहतो. पण एक गोष्ट आपण सहसा कधीच विचारात घेत नाही ती म्हणजे ही झाडे “बोलतात” का? आपल्याला ते कसे शांत, निःस्पंद, प्रतिक्रिया न देणारे दिसतात. जणू ते असतात, पण घडत काही नसतं. पण खरं तर हिरव्या जगात आतून अने


जीवभौतिकशास्त्र: जीवसृष्टीची एक अलौकिक सफर
डॉ. सतीश जी. कुळकर्णी जीवभौतिकशास्त्र हे भौतिकशास्त्रातील सिद्धांत, पद्धती आणि परिमाणात्मक दृष्टिकोन जैविक समस्यांवर लागू करणारे आंतरशाखीय शास्त्र आहे. अणूंपासून परिसंस्थांपर्यंत याचा आवाका पसरलेला आहे. हे क्षेत्र भौतिकशास्त्राच्या गणितीय मॉडेलिंग, प्रगत मोजमाप व सूक्ष्म निरीक्षण तंत्रांवर आधारित आहे. जैवरसायनशास्त्र, आण्विक जीवशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, अभियांत्रिकी व संगणकशास्त्राशी याची घनिष्ठ नाती आहेत. औषधशोध, वैद्यकीय प्रतिमांकन, जैवतंत्रज्ञान, पर्यावरणीय संवर्धन व शेती


टेस्लाचा भारतात प्रवेश —तांत्रिक संधी की ट्रोजन हॉर्स?
ब्रिगेडिअर श्री. हेमंत महाजन (निवृत्त) हा लेख टेस्लाच्या भारतातील प्रवेशामागील तांत्रिक आणि सुरक्षात्मक परिणामांवर केंद्रित आहे. टेस्ला...


भारतीय सण-उत्सवांमागचे विज्ञान
डॉ. ज्योत्स्ना निजसुरे भारतीय सण-उत्सव केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरा नसून, ते वैज्ञानिक विचारसरणीचा ठसा असलेली जीवनपद्धती आहेत....


“मानवी शरीरातील ऑबेलिस्कचा शोध: जीवनाचे आद्य रूप?”
डॉ. रेणू सिहं - मोकाशी २०२४ साली अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधक इव्हान झेलुदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड जनुकीय माहिती-संचांचे संगणकीय विश्लेषण करताना मानवी शरीरात “ऑबेलिस्क ” नावाचे अद्भुत सूक्ष्मजीव शोधले. हे सूक्ष्मजीव पारंपरिक जीवशास्त्रीय वर्गी करणाला आव्हान देतात, कारण ते ना विषाणू आहेत, ना जिवाणू आणि तरीही स्वतःची प्रतिकृती तयार करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांच्या आरएनए रचनेत “रोलिगं -सर्कल रिप्लिकेशन” ही प्रक्रिया दिसते, पण ते पेशींचा नाश न करत


औषध संशोधनातील बेडूक उडी
डॉ. नागेश टेकाळे माणसाला जिज्ञासू वृत्तीमुळे आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास अवलोकन आणि कार्यप्रणाली समजून...


कीटकनाशक समस्येवरकृत्रिम बुद्धिमत्तेचा उपाय
डॉ पूनम सिंग आणि डॉ अरविंद रानडे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे कीटक. किटकांचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक औषधांचा...


भारतीय अवकाशयात्रेचा नवा अध्याय : शुभांशु शुक्ला यांची यशस्वी अंतराळयात्रा
डॉ. मानसी माळगावकर २०२५ साल हे भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक वर्ष ठरलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर, भारताने दुसऱ्यांदा एका...


ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा भारत
श्री काशीनाथ देवधर "ऑपरेशन सिंदूर" या नावाने भारताने पहलगाम येथील निर्दयी दहशतवादी हल्ल्यानंतर नियोजनबद्ध आणि अत्यंत अचूक हवाई...


लांबलेला पर्जन्यकाळ
अनघा शिराळकर नैऋत्य मोसमी पावसाचे परतणे वायव्य भारतापासून साधारणपणे १५ सप्टेंबर पासून सुरु होते आणि १५ आक्टोबर पर्यंत पूर्ण देशातून तो परत जातो. पण अलि कडच्या वर्षांमध्ये त्याचे परतणे काही दिवसांनी लांबत आहे. त्यातच मोसमी पावसानंतर (post monsoon) निर्माण होणाऱ्या चक्री वादळांमुळे पडणाऱ्या मुसळधार पावसाची भर पडत आहे. शिवाय नैऋत्य मोसमी पावसानंतर ईशान्य मोसमी पाऊस सुरू होतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने २०२५ या वर्षीच्या मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त (above normal) र


घोस्टमासेमारी: सागरी पर्यावरणावरील एक अदृश्य, पण घातक संकट
मंगेश बिरादार आणि महेश शेटकार घोस्टमासेमारी ही सागरी पर्यावरणातील एक गंभीर व अदृश्य समस्या आहे. हरवलेली किंवा समुद्रात टाकून दिलेली जाळी वर्षानुवर्षे मासे, कासवे, डॉल्फिन्स, शार्क्स यांना अडकवून मारतात. त्यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास , प्रवाळ भित्तींचे नुकसान, मायक्रोप्लास्टिकचा प्रसार व मासेमारी उद्योगावर विपरीत परिणाम होतो. या संकटावर उपाय म्हणून सजैवविघटनशील जाळ्यांचा वापर, GPS तंत्रज्ञान, घोस्ट नेट रिमूव्हल मोहिमा आणि कठोर कायदे आवश्यक आहेत. सागरी जैवविविधतेचे रक्षण हे सर्वा


हवामान बदल आणि भारतातील विकास: विकासाला एक नैसर्गिक आव्हान
डॉ अरविंद रानडे हवामानात टोकाचे वैविध्य असलेल्या भारतासारख्या देशात हवामानातील बदल अनपेक्षि त परिवर्त न घडवून आणत आहेत. बदलणारे तापमान,...


नदी पुनर्जीवित करण्यासाठी आणि उपजीविका निर्मितीसाठी: गवत परिसंस्थेचे योगदान
जयाजी पाईकराव भारतामध्ये हिमनद्या व पावसावर आधारित अश्या दोन प्रकारच्या नद्या वाहतात. हिमनद्या उन्हाळ्यामध्ये वाहतात तर पावसावर आधारित...


निसर्गाचे सूक्ष्म आधारस्तंभ
डॉ योगेश शौचे सूक्ष्मजीव हे पृथ्वीवरील सर्वात व्यापक आणि अदृश्य जीव असून, माती, पाणी, हवा आणि मानवी शरीरात सर्वत्र आढळतात. ते जैवरासायनिक...
शोध नव्याचा
सृष्टिविज्ञान आणि जैवविविधता


ला कॉन्झ: न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) भारतीय प्रयोगशाळा
श्री. नारायण वाडदेकर ला कॉन्झ म्हणजे ‘कॉन्झर्वेशन ऑफ एन्डेन्जर्ड स्पिसीस - Conservation of Endangered Species’ ही एक हैदराबाद, तेलंगणामध्ये स्थापित एकुलती एक न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) भारतीय प्रयोगशाळा आहे. वनातील प्राण्यांच्या शिकारीचा गुन्हा आधुनिक वैज्ञानिक चाचण्यांच्या मदतीने न्यायालयात सिद्ध होईल आणि गुन्हेगाराला शिक्षा होईल याची तजवीज ‘ला कॉन्झ’ करते. हा विज्ञानाचा व्यावहारिक फायदा आहे. ला कॉन्झ ही एक भारतीय न्यायवैद्यसहाय्यक प्रयोगशाळा आहे. तिचे नाव ‘कॉन्झर्वेश न ऑफ एन्ड


आयसीएमआर-राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्था (आयसीएमआर-एनआयव्ही, पुणे)
डॉ . सुनिल रा. वैद्य आपण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे कोरोना विषाणूच्या जलद तपासण्या/ लसीचे संशोधन केलेल्या पुणे येथील आयसीएमआर...


पहिली भारतीय महिला अभियंता:अय्यलसोमयाजुला ललिता
अनघा शिराळकर १५ सप्टेंबर म्हणजे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया रचणाऱ्या अभियंत्यांचा गौरव करण्याचा दिवस. एखाद्या...


इस्रो : स्वदेशी विज्ञानाचीअंतराळ झेप
श्री. विनय मधुकर जोशी १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आपली ५६ वर्षांची प्रेरणादायी वाटचाल पूर्ण करत आहे....


डॉ. मलूर रामस्वामी श्रीनिवासन
डॉ. श्रीनिवासन देशातील बिनीचे यांत्रिकी-अभियंत्रज्ञ होते. भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे ते आधारस्तंभ होते. डॉ. श्रीनिवासन यांनी डॉ. होमी...


प्रिऑन्स : बिघडलेली घडी
रोहिणी कुलकर्णी (पांढरे) पेशी ही कर्बोदके, प्रथिने, मेद्ययुक्त पदार्थ आणि न्यूक्लिक ऍसिड अशा चार प्रकारच्या महारेण्णूंपासुन बनलेली असते. केवळ प्राथमिक स्वरूपातील प्रथिनांच्या रचनेत बदल झाल्यामुळे सुद्धा रोग निर्मिती होते याचे प्रिऑन हे एकमेव उदाहरण आहे. प्रिऑन (प्रथिने) हे एक अनंत घड्या असलेले विकृत प्रथिन आहे. आपल्या जीवनात ही प्रथिने मोठ्या प्रमाणात उत्पात घडवून आणु शकतात. प्रिऑन्सची गणना सजीवात केलेली नाही याला मिस्फोल्डेड प्रोटीन (misfolded Protein) असे म्हणतात. हे प्रथिन


स्कॅलिडोफोरा
डॉ. पुरुषोत्तम काळे आपण या पूर्वी पहिले की निर्मो चीपशुक (इकडाय सोझोआ) हा आद्यमुखि मं धील (प्रोटोस्टम्स) एकवंशोद्भवी (मोनोफाय लॅटीक) गट असून त्यात स्कॅलि डोफोरा (ज्यात लोरिसीफेरा, प्रायापुलिडा आणि काय नोऱ्हिन्का संघांचा समावेश होतो) आणि क्रिप्टोव्हर्मिस (ज्यात नेमॅटॉइडा व पॅनआर्थ्रोपोडा या उपगटांचा समावेश होतो) असे दोन उपगट आहेत. स्कॅलि डोफोरा हा समुद्री, छद्म-देहगुही प्राण्यांचा लहान गट निर्मोचनीय (झडून जाणारी) कायटिन या शर्करा बहुवारिकाची कठीण पण लवचिक उपत्वचा, अंतर्मुखावर


संकल्पना बदलांनंतरचा काळ
श्री आनंद घैसास तारे हे जणू दूरचे सूर्यच आहेत, कदाचित त्यांच्या स्वतःच्या ग्रह प्रणालीही आहेत या कल्पनेला ‘वैश्विक बहुलवाद’ असे नाव देण्यात आले होते. या दिशेने केलेल्या संकल्पना प्राचीन काळात, एनाक्सागोरस आणि सामोसच्या अरिस्टार्क स यांनी व्यक्त केल्या होत्या, परंतु त्यांना मुख्य प्रवाहात काही त्या काळात मान्यता मिळाली नाही. युरोपियन पुनर्जागरण काळातील पहिले खगोलशास्त्रज्ञ जिओर्डानो ब्रुनो यांनी त्यांच्या ‘डी ल’इन्फिनिटो युनिव्हर्सो एट मोंडी’ (१५८४) मध्ये तारे हे दूरचे सूर्य आ


१६ आणि १७ व्या शतकातील संकल्पना क्रांती
आनंद घैसास जोहान्स केप्लर (१५७१–१६३०) हे जर्मन खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि आधुनिक विज्ञानाचे जनक मानले जातात. त्यांनी ग्रहांच्या गतीचे तीन नियम मांडले, ज्यामुळे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताला पाया मिळाला. प्राग येथे टायको ब्राहे यांच्या सहाय्यक म्हणून कार्य करताना मिळालेल्या निरीक्षणांवरून त्यांनी ग्रहगतीचे अभ्यास पूर्ण विश्लेषण केले. त्यांच्या Astronomia Nova, Harmonices Mundi आणि Epitome Astronomiae Copernicanae या ग्रंथांनी खगोलशास्त्रात क्रांती घडवली. प्रकाशशास्त्रा


भाषा विज्ञानाची ओळख
तेजाली चंद्रकात शहासने अनेकदा आपल्याला प्रश्न की आपल्या भाषेचं मूळ कोणतं, एखाद्या गोष्टीसाठी जगभरात साधारण सारख्याच प्रकारचा शब्द कसा काय बरं, अनेकदा भाषा निराळ्या असल्या तरी त्यांचं व्याकरण सारखंच कसं काय किंवा भाषा दर बारा मैलावर बदलते तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत ती मराठीच कशी आणि त्याहीपुढे जाऊन आजचा काळातला अगदी सुसंगत प्रश्न की संगणक भाषा कशी शिकतं? तर या सर्वांची उत्तरे आपल्याला भाषाविज्ञानात मिळतात. भाषाविज्ञान अर्थात लिग्ंविस्टीक्स म्हणजे काय बरं? तर भाषाविज्ञान ही
भारतीय संशोधन संस्था परिचय आणि भारतीय वैज्ञानिक
विज्ञान लेख
भारतीय ज्ञान परंपरा आणि अध्यात्म विज्ञान


विज्ञान शाप की वरदान -भारतीय चिंतन
सुरेश गजानन भागवत भारतीय चिंतनात विज्ञानाच्या विधायक आणि विघातक या दोन्ही बाजूंचा साकल्याने विचार झालेला दिसतो. विज्ञान व त्यावर आधारित स्थानिक आवश्यकतेनुसार तंत्रज्ञान आपल्या देशातही त्या-त्या काळात विकसित होत होते. निसर्गाचे शोषण आणि दोहन यातला संयम त्यात स्पष्ट दिसून येतो. भारतीय चिंतनात आढळून येणाऱ्या या संयमी मार्गावर प्रकाश टाकणारा हा लेख. शालेय जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान शाप की वरदान या विषयावर बोलण्याचा किंवा लिहिण्याचा प्रसंग


न चालता सूर्याचे चालणे
श्री विठ्ठल रायगावकर आपल्या सूर्यमालिकेमध्ये एक ग्रह असा आहे की जिथे सूर्य पश्चिमेला उगवतो. शुक्र ग्रह. हो. शुक्र ग्रहावर सूर्य पश्चिमेला उगवतो. पण पृथ्वीवर मात्र पूर्वेलाच उगवतो. हळूहळू वर येतो आणि पश्चिमेला मावळतो. आपण रेल्वेमधून प्रवास करतो त्यावेळेला खिडकीतून बाहेर पाहिले की झाडी मागच्या दिशेने पळताना दिसतात म्हणजे आपण पुढे जात असतो तेव्हा झाडी मागे जातात. अगदी तसंच आहे पृथ्वीच आणि सूर्याच. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकड


आकाशात कडाडणारी वीज
श्री. विठ्ठल रायगावकर पावसाळ्यात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट आपण नेहमीच बघतो. विशेषतः वळीवाच्या पावसात हे अधिक प्रमाणात दिसून येते. ही वीज म्हणजे नेमकं काय असते? ती कशी निर्माण होते? या ढगांचा, वीजांचा, गडगडाटाचा आणि कडकडाटाचा परस्परांशी काही संबंध आहे का? या वीजेत आणि आपण घरात वापरतो त्या वीजेत काही साधर्म्य हे का? आकाशात चमकणारी ही वीज संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथात कशी वर्णिली आहे हे आपण जाणून घेवू. वीजेबद्दल आपल्या मनात एक अनामिक स्वरूपाची भीती असते. बरेचस


संस्कृती आणि विज्ञान
श्री. संदिप राणे विज्ञान आणि संस्कृती हे परस्पर विरोधी असतात असा भ्रम निर्माण केला जातो. संस्कृती आणि विज्ञान सोबतच वाटचाल करीत असतात. त्यांची भूमिका परस्परांना पूरकच असायला हवी. भारताच्या भूतकाळाचा अभ्यास केल्यास, तसा विचार आपल्या पूर्वजांनी केला होता हे लक्षात येते. मनुष्य हा एक प्राणी आहे हे काही शेकडो वर्षापूर्वीच्या मानवाला ठामपणे माहीत होते तेवढं आता वाटत नाही. ते पुराव्यामध्येही सिद्ध होतं. विकासाच्या वाटेवरून चालताना निसर्ग, संस्कृती यांचा संबंध कमी कमी होत जातो. चाली


निसर्ग संवर्धनाच्या लोक परंपरा
श्री. विजय सांबरे भारतीय संस्कृतीत निसर्ग आणि मानव यांचे नाते अद्वैतात्मक आहे. निसर्गपूजक परंपरा, जैव-सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक समुदायांनी जपलेली शाश्वत संवर्धन प्रक्रिया यांचा वेध घेणारा हा लेख. सह्याद्रीपासून ते प्रवरा खोऱ्यापर्यंत, आदिवासी, शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार समाजाच्या निसर्गाशी असलेल्या परस्परसंबंधांचा अभ्यास येथे मांडलेला आहे. अशा लोककेंद्री दृष्टिकोनातून आजच्या विकासाच्या दिशेला नवसंवेदन मिळू शकते, हा संदेश देणारा अभ्यासपूर्ण लेख. अश्माचमे मृत्तिकाचमे गिरयश
विज्ञान पुस्तक परिचय
Check back soon
Once posts are published, you’ll see them here.
bottom of page



