top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

सेमीकॉन २०२५: भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

श्री संजीव केसकर

मराठी अनुवाद: डॉ. रोहिणी कुळकर्णी (पांढरे)


दिल्ली येथे सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या “सेमिकॉन 2025” मध्ये ४५ पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जगात एक वेगाने विकसित होणारी अर्थ व्यवस्था म्हणुन आपला देश प्रगती करत आहे. सेमीकंडक्टर (अर्ध वाहक) या क्षेत्रात असलेल्या उपलब्ध संधी पहाता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना राबवून जगभरातील या क्षेत्रातील बलाढ्य कंपन्याना आपल्या देशात व्यवसाय करण्यासाठी योग्य ते वातावरण उपलब्ध करून देत जागतिकीकरणा कडे देश उत्तुंग भरारी घेत आहे.


“जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी”...असे एक संस्कृत सुभाषित आहे. आपण सर्व अतिश य भाग्यवान आहोत कारण आपण या भारतभूमीत जन्मलो, सुजलाम सुफलाम अशी  आपली ही मातृभूमी कोणी एकेकाळी येथे सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जाते म्हणजेच अतिशय सधन आणि समृद्ध अशी भूमी, आज हे जगातील वेगवान प्रगतिशील राष्ट्र असून नुकत्याच 2025 मध्ये आलेल्या जी डी पीरँकिंग (सकल देशांतर्गत उत्पादन सर्वेक्षण) नुसार आपला भारत हा चौथ्या स्थानावर आहे ज्याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. राष्ट्र उभारणीसाठी विज्ञान तंत्रज्ञान आणि नवकल्पना अत्यावश्यक आहेत विज्ञान नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यास, प्रदूषण कमी करण्यास आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्यास मदत करते. जागतिकीकरण म्हणजे जगभरातील अर्थव्यवस्था, समाज आणि संस्कृतींना जोडणारी आणि त्यांच्यातील परस्परावलंबन वाढवणारी प्रक्रिया आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, जग प्रवास हे सर्व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सुकर होते ज्या योगे संस्कृतीची देवाण-घेवाण होते आणि विविध देशांना अनेक संधी प्राप्त होतात.


याच बाबीचा विचार करून आपल्या देशाने कोविड काळात, “आत्मनिर्भर भारत” ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणायला सुरुवात केली आणि आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना वेळेत कोरोनाची लस मिळाली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. असेच दुसरे उदाहरण म्हणजे “ऑपरेशन सिंदूर” आत्मनिर्भर भारत या संकल्पनेमधुन तयार करण्यात आलेली स्वदेशी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांनी चोख कामगिरी बजावली ज्या योगे भारताने पाकिस्तानने केलेल्या कुरापतींना चोख प्रति उत्तर दिले आणि सर्व जगात आपले निर्विवाद प्रभुत्व सिद्ध केले.



विज्ञान आणि तंत्रज्ञान कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे खरे मोजमाप असते आणि जर जगामध्ये वर्चस्व गाजवायचे असेल तर पहिले विज्ञानात स्वावलंबी होणे ही महत्त्वाची बाब ठरते त्यामुळे राष्ट्राचा सर्वांगीण विकास घडू शकतो ह्या दृष्टीने पाहू जाता आजच्या उन्नत भारतात “अर्धवाहक (सेमीकंडक्टर ) उद्योग” हा अतिशय वेगाने वाढण्याची मोठी क्षमता असलेले क्षेत्र म्हणून आपल्यासमोर येत आहे, ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळू शकेल. नावातच असलेला अर्धवाहक अतिशय महत्त्वाचा आहे हा विद्युत प्रवाह वाहून नेतो आणि त्याला अवरोध पण करू शकतो म्हणजेच हे एक अतिशय महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे ज्याच्या माध्यमातून आपण पाहिजे तेव्हा विद्युत प्रवाह संचारीत करू शकतो आणि पाहिजे तेव्हा थांबवु शकतो आणि म्हणूनच हा अर्धवाहक विकसित गतिमान भारतासाठी अतिशय महत्त्व पूर्ण उद्योग म्हणून समोर येतो आहे. अर्धवाहकाचा (सेमीकंडक्टर ) उपयोग त्याच्या या अद्वितीय अशा गुणधर्मा मुळे होतो आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मूलभूत घटक बनवण्यासाठी तो वापरण्यात येतो. स्मार्ट फोन, ऑटोमोबाईल्स, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात असलेल्या प्रणालींपर्यंत वापरल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींना ऊर्जा देण्याचे कार्य सेमीकंडक्टर करतात ज्याला या क्षेत्रात चिप्स असे संबोधण्यात येते आणि त्या दृष्टीने सिलिकॉन ही एक महत्त्वाची सामान्य अर्धवट सामग्री आहे ज्याचा वापर खालील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये केल्या जातो.

  • इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात स्मार्ट फोन कॉम्प्युटर, टॅब, लॅपटॉप, टीव्हीसाठी याचा वापर करण्यात येतो तसेच प्रिंटर्स, वॉशिंग मशीन, एसी इत्यादी घरात वापरण्यात येणाऱ्या उपकरणांमध्ये देखील याचा वापर होतो.

  • दळणवळण हा कुठल्याही संस्कृ तीचा मुळ गाभा असून मानवाच्या विकासासाठी याद्वारे वस्तुंचे आदान प्रदान शक्य होते. सद्यस्थितीत वापरात असलेल्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता इलेक्ट्रिकल वाहने शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्व पूर्ण ठरतात ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्धवाहकांचा (सेमीकंडक्टर ) उपयोग होतो.

  • आरोग्य सेवेमध्ये सेमी कंडक्टर चा मोठ्या प्रमाणावर वापर होतो येथे वेगवेगळे वैद्यकीय उपकरणे जसे की पेसमेकर, आयसीयू मॉनिटरिंग, एमआरआय (MRI), सिटी स्कॅन यांचा समावेश होतो

  • अवकाश आणि संरक्ष ण या क्षेत्रा त वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स, क्षेपणास्त्रे आणि आधुनिक प्रणाली यांचा समावेश होतो म्हणजेच आपल्या जी वनातील वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून रोबोटि क्स, एआय (AI) असे सर्व समावेशक बाबी या सेमीकंडक्टर वरती आधारित असतात.


आणि म्हणून अर्धवाहक (सेमीकंडक्टर ) हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधारस्तंभ असून घरगुती वस्तुंपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत या क्षेत्रामध्ये सेमीकंडक्टर मुळे गरुड झेप घेणे सहज शक्य होते.


इलेक्ट्रॉनिक प्रणाली डिझाईन आणि उत्पादन (ESDM) हा भारतातील सर्वात जलद वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे जिथे 1.42 अब्ज लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉप वापरत आहेत जे इंटरनेट कनेक्शनसाठी राऊटरला जोडल्या जातात म्हणजेच कुठल्या ना कुठल्या रीतीने त्यांचा सेमीकंडक्टरशी संपर्क येतो. इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालय (MeitY) द्वारा 2022 मध्ये प्रकाशित अहवालानुसार भारतातील एकूण इलेक्ट्रॉनिक बाजार हा सुमारे 120 अब्ज डॉलर होता. तथापि यामधील स्थानिक उत्पादन मूल्यवर्धन फक्त पंधरा ते वीस टक्के होते म्हणजेच उर्वरित सर्व गोष्टी आपण आयत करतो अथवा आपला पैसा इतर देशांकडे जातो, जर आपण या क्षेत्रात आत्मनिर्भर झालो तर या अहवालानुसार 2030 पर्यंत हा उद्योग जवळपास 400 अब्ज डॉलरपर्यंत वाढणार असून MeitYच्या अहवालानुसार स्थानि क मागणीमध्ये 280 अब्ज डॉलर आणि निर्यातीमध्ये 120 अब्ज डॉलर समाविष्ट आहे, या सर्व गोष्टींचा विचार भारताच्या राष्ट्रीय सेमी कंडक्टर मिशनने (NSM) अत्यंत गंभीरतापुर्वक करून भारताला सेमीकंडक्टर उद्योगांमध्ये जागतिक स्तरावरील प्रमुख दर्जाला पोहोचवायच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली असून 2021 मध्ये झालेली MeitY स्थापना याला मूर्त स्वरूप देत आहे. जागतिक स्तरावरील सेमीकंडक्टर ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गज कंपन्यांना आपल्या देशात येण्यासाठी आकृष्ट करणे त्यांच्या गरजा पूर्ण करून वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन उद्योज कीय उपक्रम (स्टार्ट अप) आणि घरेलु वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना प्रोत्साहित करून या क्षेत्रात आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवणे हे आपल्या समोरचे ध्येय असून या दृष्टीने शासनाने 76 हजार कोटी रुपये राष्ट्रीय सेमीकंडक्टर मिशनला उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्धवाहक निर्मिती करणाऱ्या कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहे. त्या अनुषंगाने या क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांसोबत भागीदारी करून युवा वर्गाला योग्य ते प्रशिक्षण, संशोधन आणि आखणी करून प्रत्यक्ष निर्मिती आणि जुळणी प्रक्रिया (assembly eeprocess) निर्मिती अशा स्वरूपातील भरीव कामगिरीचा समावेश राष्ट्रीय सेमीकंडक्टर मिश नने (NSM) सुरु केला आहे.


इलेक्ट्रॉनि क बाजाराच्या विश्लेषणात असे लक्षात आलेले आहे की यातील जवळपास 40 ते 50 टक्के भाग हा प्रिंटेड सर्कि ट बोर्ड आणि इतर उपक्रमांचा (PCB) असून वेगवेगळ्या घटकांना जोडण्यासाठी आणि आधारासाठी त्याचा वापर केला जातो, प्रदर्शनी (डिस्प्ले) भाग आणि विद्युत घट (बॅटरी) यांचा इथे समावेश होतो यापैकी जवळपास 90% गोष्टी आपण उत्पादन करत नाही आणि म्हणून ह्या वस्तू आपल्याला इतर देशांमधून आयात कराव्या लागतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बौद्धिक मालमत्ता (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी) मध्ये मागे आहोत म्हणजेच आपण फक्त सर्विस इंडस्ट्री आणि मोठमोठ्या कंपन्यांसाठी जुळवा जुळवीचे काम व्यवस्थित करत असलो तरी त्यातील बौद्धिक गोष्टींचे योग्य मूल्य आपणास त्यामुळे प्राप्त होऊ शकत नाही. याचाच अर्थ असा की आपण चांगले काम करतो पण त्याचा फायदा इतर देशांना होतो जसे की आपण आयफोन, अँपल तयार करतो पण यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तु इतर देशांमधून आयात केल्या जातात आणि आपण फक्त जोडण्याचे काम करतो, म्हणजे हे क्षेत्र आपल्यासाठी अतिशय महत्वाचे ठरते येथे आपण प्रगती  केली तर आपल्याला त्याद्वारे फायदा होईल त्यासाठी आपण आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे.


सदरील बाबींच्या भारत सरकारने अतिशय योग्य रीतीने विचार केला असनू त्या दृष्टीने प्रॉडक्शन लिंक इन्सेंटिव्ह (PLI) योजना तयार केलेली आहे. सदरील योजनेत कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर (CMOS), डिस्प्ले वाफर (display wafer) जो एक सिलिकॉनचा अतिशय पातळ आणि गुळगुळीत असा तुकडा असून सेमीकंडक्टर चिप्स बनवण्यासाठी आधार म्हणून वापरल्या जातो आणि संयुक्त सेमीकंडक्टर, (wafer fabrication) धोरणाची घोषणा केलेली आहे त्यात असेंब्ली टेस्टिंग मार्किंग अँड पॅकेजिंग (ATMP), सेमी कण्डक्टर उद्योगांमध्ये अतिशय महत्त्वाचे असे चिप्स यांची निर्मिती आणि विक्री करणे ज्यामुळे सदरील उद्योगातील भांडवली खर्च कमी करता येऊन संशोधन व विकासावरती लक्ष केंद्रित करता येईल अशा कंपन्या (fables design), आऊटसोर्स सेमी कण्डक्टर असेंबली (OSAT) अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांसाठी प्रोत्साहन देऊन इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचा क्लस्टर करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.


भारताकडे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन (VLSI) साठी आवश्यक अशी चीफ भौतिक डिझाईन सत्यापन आणि सॉफ्टवेअर विकासासाठी उत्कृष्ट प्रतिभा आहे ज्याचा सुनि योजित वापर करून आपण सर्व प्रमुख जागतिक सेमीकंडक्टर कंपन्यांसाठी भारतात त्यांच्या कॅप्टिव्हडि झाईन (संपूर्ण आखणी आकृतीबंध आणि प्रक्रिया राबवणे व विकास करणे) केंद्रासाठी योग्य असे काम करत आहोत आणि त्या अनुषंगाने स्थानिक हातांना काम देऊन तेथे उद्योगधंदे वाढायच्या दृष्टीने सरकारने ध्येय धोरण आखले असून त्यासाठी प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह (PIL) राबवण्यास सुरुवात केली आहे. एकूण चार लक्ष डॉलर मूल्यांच्या 50% इतके प्रत्यक्ष काम सुरुवात झाल्यानंतर आणि विस्तारीकरणासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने (deployment) प्रोत्साहन देण्याचे सुरू केलेले आहे. सदरील योजनांना मजबूत करून त्यांचे व्यवस्थित अनुपालन करण्यासाठी भारतीय सेमीकंडक्टर मिशन (NSM) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ह्या अंतर्गत खालील प्रमुख तीन बाबींचा समावेश येथे करण्यात आलेला आहे.

  1. कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर (CMOS) अंतर्गत इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरली जाणारी कॉम्प्युटर प्रोसेसर मेमरीचे अशा सामग्री ज्यांचा आकार 300 mm असतो आणि किमान गुंतवणूक तीन अब्ज डॉलर्स असते त्यातील 50 टक्के अनुदान सरकारतर्फे मिळण्याची सोय केलेली आहे.

  2. यातील दुसरा घटक हा डिस्प्ले फॅब (display fabrication plant), एलसीडी पॅनल आधी उत्पादित करणाऱ्या भारताअंतर्गत कंपन्यांना देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला चालना देण्यासाठी आणि जागतिक पुरवठा शाखेत भारताचे महत्त्व वाढवण्यासाठी जिथे प्रत्येक महिन्यात 60,000 पॅनल टीएस टीएलसीडीचे उत्पादन होते किंवा AMOLED अंतर्गत येणाऱ्या 30,000 पॅनलचे प्रत्येक महिन्यात उत्पादन होते अथवा ज्या प्रकल्पाची किंमत 1.4 अब्ज डॉलर इतकी आहे अशा प्रकल्पांना त्यांच्यामधील भाग भांडवतील 50% भार उचलण्यास सरकार तयार आहे.

  3. कंपाउंड सेमी कण्डक्टर प्रकल्प जेथे सेन्सर, ATMP, OSAT, पॉवर सेमी कंडक्टर आधी वस्तूंचे उत्पादन केले जाते त्यासाठी पण मदत करण्यात येत आहे.


सदरील योगदाना व्यतिरिक्त ज्या, ज्या राज्यांमध्ये अशा उद्योग प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे ते राज्य पण भरीव आर्थिक मदत करत आहे जी जवळपास एकूण आर्थिक बाबींच्या वीस ते पंचवीस टक्के असू शकते म्हणजेच जवळपास सेमीकंडक्टर उद्योग सुरू करण्यात येईल 75 टक्क्यापर्यंतचा समर्थन अशा प्रकल्पांना मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टर प्रकल्प भारतभरात सुरू होत आहेत. सप्टेंबर 2025 पर्यंत गुजरात, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, ओरिसा आणि आसाममध्ये भारतीय सेमी कंडक्टर मिशन (ISM) द्वारे दहा प्रस्ताव मंजूर झाले आहेत आणि पुढील दोन ते तीन वर्षात या क्षेत्रात उत्तुंग भरारी आपण घेऊ शकू याबद्दल दुमत नाही. याव्यतिरिक्त सेमीकंडक्टर क्षेत्रातील इतर  मदतक्षेत्रे (Passive unit) यांचे देखील योगदान महत्त्वाचे ठरत असून सेमीकंडक्टर क्षेत्रापैकी जवळपास 15% योगदान या क्षेत्राचे असते आणि त्यामुळे त्यांना देखील अनुदान उपलब्ध करून द्यायचे आवश्यकता आहे. सेमी कंडक्टर क्षेत्रातील 2030 मधील भविष्य पाहता MeitY ने एप्रिल 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजना कार्यान्वित केली असून पीसीबीच्या स्थानिक उत्पादनांची निर्मिती त्याद्वारे करण्यात येईल आणि ही जवळपास 23 हजार कोटींची योजना आहे.


सेमी कंडक्टर क्षेत्रात आपल्या देशाला आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला चालना देण्याच्या दृष्टीने दोन ते चार सप्टेंबर 2025 या दरम्यान SEMICON (सेमी कण्डक्टर कॉन्फरन्स) दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. जवळपास 30,000 लोकांनी  या कॉन्फरन्सला भेट दिली, 350 हून अधिक कंपन्यांनी त्यांची उत्पादने प्रदर्शित केली. सेमीकंडक्टर क्षेत्रातील मान्यवरांनी  विद्यार्थ्यांना संबोधित करून वेगवेगळ्या गोष्टींची माहिती दिली. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस आवर्जून उपस्थित होते यावरून या क्षेत्रा बद्दल देशाची बांधिलकी आपल्या लक्षात येऊ शकते. जागतिक बाजारपेठेमध्ये या क्षेत्राची असलेली मागणी, आपली उत्पादन क्षमता, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि उत्पादकतेला चालना देणारे शासनाचे औद्योगिक धोरण आपल्यासाठी निश्चित आपल्या उंबरठ्यापर्यंत चालून आलेली एक सुवर्णसंधी असून आपण तिचा पुरेपूर उपयोग करून आपल्या देशाला गौरवशाली बलशाली आणि स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणारा देश म्हणून जागतिकीकरणात सक्षम करायची आवश्यकता या दृष्टीने निश्चित आहे. सेमीकंडक्टर हे गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट उत्पादन आहे आणि म्हणून या आव्हानांना समोर जाण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित अभियंता तज्ञ उच्चविद्या विभूषित आणि प्रशिक्षित कामगार वर्ग यांची गरज भासणार आहे यासाठी फक्त पैशाची तरतूद न करता मोठ्या प्रमाणावर ती वातावरण निर्मिती आणि कुशल मनुष्यबळ विकास यावर भर दिल्यास आपण निश्चितच आपले लक्ष गाठू शकु.



(लेखक 40 वर्षापेक्षा जास्त भारतातील महत्त्वाच्या सेमीकंडक्टर कंपन्यांसाठी डायरेक्टर व्हॉइस प्रेसिडेंट आणि देशातील प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर आंतरराष्ट्रीय कंपन्या जशा AMD, फ्री स्केल सेमी कण्डक्टर, PMC, Sierra आणि Arrow येथे काम केलेले आहे. इंडिया इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर या संघटनेचे ते माजी अध्यक्ष असून सध्या अरविंद कन्सल्टन्सी मध्ये सीईओ या पदावर कार्यरत आहेत.)


 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page