top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

महाऔषधी कोरफड

मनिषा पाटील

औषधी वनस्पतीत आरोग्य सुधारणे, रोग बरे करणे व प्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात. महाऔषधी कोरफड हे मानवाला निसर्गाने दिलेले वरदान आहे. सर्वांनाच कोरफडीचे काही गुणधर्म माहिती आहेत. पोटात दुखण्यावर, डोळ्यांच्या विकारावर तसेच केसांच्या सौंदर्यासाठी कोरफडीचा उपयोग भारतीय पूर्वी पासूनच करत आहेत. परंतु रक्तदाब, कॅन्सर, एड्स, मधुमेह यासारख्या अनेक रोगांवर कोरफड उपयोगी आहे. हे आपल्याला माहि ती आहे का? यासाठी कोरफडी बद्दल अधिक माहिती घेणे आवश्यक आहे.



जगभरात कोरफडीच्या ३०० हून अधिक जाती आहेत त्यातल्या ११ जाती विषारी आहेत आणि फक्त चारच जातीत औषधी गुणधर्म आहेत. त्यामध्ये ‘बार्बाडेन्सीस मीलर’ (Barbadensis miller) ही सर्वात उपयुक्त कोरफड आहे. यात २०० पेक्षा जास्त जीवनावश्यक गोष्टी असल्याने ती जगातील सर्वात उपयुक्त वनस्पती ठरलेली आहे. कोरफडीचे झाड तीन, चार वर्षाचे झाल्यावर त्यात औषधी गुण आढळून येतात. कोरफडीचे हिरवे साल काढल्यावर त्यात असणारा पांढरा गर (Gel) हाच सर्व गुणसंपन्न असतो. या गराचे, हवा व प्रकाश यापासून नैसर्गिकपणे संरक्षण केल्यास त्याचे मूळ गुणधर्म कायम राहतात.


कोरफडीचे गुणधर्म व उपयोग

  1. कोरफडीत प्रामुख्याने जी वनसत्व अ,बी,सी,ई, B12 तसेच बीटा कॅरोटीन, तंतू व १८ महत्त्वाची ॲमीनो ॲसीड आहेत. म्हणूनच कोरफड ही महाऔषधी आहे. कोरफड ही डोळे, त्वचा, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड तसेच स्त्रियांच्या विकारावर उपयोगी आहे.

  2. पचनसंस्था - कोरफड पचनक्रिया सुधारते. कफ व पित्त दोष पूर्णपणे तर वातदोष काही प्रमाणात नाश करते.

  3. विषद्रव्ये - आपण खात असलेले अन्न, पाणी व हवा, औषधातूनही आपल्या पोटात विषद्रव्य (Toxins) साठत असतात, ही विषद्रव्ये कोरफड पूर्णपणे बाहेर टाकते.

  4. रक्तवहन संस्था - कोरफड पांढऱ्या व लाल पेशींची निर्मिती करते. तसेच शरीरातील नवीन पेशीची निर्मिती होऊन रोग्याची रोग प्रतिकारशक्ति वाढते.

  5. हृदयविकार - हृदय विकरावर कोरफड उपयोगी ठरते. कोरफड रक्तातील ट्रायग्लिसरॉईडचे प्रमाण कमी करते तर चांगल्या कोलेस्टेरॉल चे प्रमाण वाढवते. विटामिन अ, क, ई व उत्तम अँटीऑक्सीडंट असल्यामुळे हृदयाचे संरक्षण होते. हृदयाला पौष्टिक द्रव्य (Nutrition) मिळून हृदयाची कार्यशक्ती वाढते.

  6. स्त्रियांचे विकार - स्त्रियांच्या विविध रोगांवर जसे गर्भाशय व केस गळणे यावर कोरफड उपयुक्त आहे.

  7. मूत्रवह संस्था - कोरफड पेशी तील जास्त असलेले पाणी बाहेर टाकते. मुतखडा किंवा डायलेसिस वर असलेल्या व्यक्तींसाठी उपयोगी

  8. त्वचाविकार - कोरफडीचे अणुरचना अतिशय लहान असते. त्यामुळे त्वचेवर कोरफड लावल्यास ती सहजपणे आतपर्यंत जाते. त्वचा मऊ व सतेज करते. कोरफड रस सेवनाने नवीन पेशी निर्मिती होते. त्यामुळे इतर औषधांपेक्षा ६० ते ७०% कमी वेळात जखम भरून येते. तसेच रक्त शुद्धी करते. त्यामुळे खरूज नायटे तसेच सोरायसिस सारख्या भयानक त्वचा विकारांवरही कोरफडीच्या सहाय्याने पूर्णपणे बरे होतात. तसेच त्यासाठी Glycine, Threonine, Beta Carotene ही द्रव्य फायदेशीर असतात.

  9. मेंदु व मज्जासंस्था- मेंदु व मज्जासंस्थेला कोरफड सदृढ करते. कोलिन मुळे Choline स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

  10. मधुमेह - कोरफड स्वादुपिंडाचे कार्यात मदत करते. कोरफडीत क्रोमियम धातु असतो त्याने रक्तातील साखरेचे प्रमाण व इन्सुलीनचे प्रमाण योग्य प्रकारे नियंत्रणात राहते.

  11. कॅन्सर व एड्स - अमेरिकेतील अन्न व औषध केंद्राने एड्स व कॅन्सर रुग्णांसाठी कोरफडीच्या उपयोगासाठी १९९४ मध्ये परवानगी दिलेली आहे.

  12. कोरफडीने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच वृद्ध व आजारी व्यक्तींसाठी कोरफडीतील पोषक द्रव्ये शक्तिदायी ठरतात.

  13. प्रति कारशक्ती - कोरफडीतील अमिनो ऍसिड, पौष्टिकद्रव्ये, जीवनसत्वे अशा जीवनावश्यक गोष्टींमुळे मुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय एलर्जी, सर्दी , खोकला, अस्थमा, अंगावरील सूज, अनेमिया, दंतरोग, रक्तनलिकांची सूज, सायनस, कावीळ, फिट्स येणे, डोकेदुखी, पाठदुखी, स्नायुदुखी अशा विविध विकारांवर कोरफड उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे .

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page