top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

आत्मनिर्भरतेमुळे भारत अधिक बलवान

  • 2 days ago
  • 4 min read

काशीनाथ दामोदर देवधर


निर्देशित पिनाक (LRGR-120) अग्निबाणाच्या यशस्वी चाचण्यांमुळे भारताची संरक्षणक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. डीआरडीओच्या नेतृत्वाखाली विकसित झालेल्या या स्वदेशी प्रणालीमुळे १२० कि मी अंतरावरील शत्रुलक्ष्य अत्यंत अचूकतेने, सीमा न ओलांडता भेदणे शक्य झाले आहे. विद्यमान पिनाक प्रक्षेपकांवरूनच हे अग्निबाण डागता येत असल्याने जलद तैनाती, कमी लॉजिस्टिक गरज आणि “शूट अँड स्कूट” क्षमता मिळते. उद्योग, संशोधन संस्था व सेनेच्या समन्वयातून आत्मनिर्भर भारत अभियानाचे हे प्रभावी उदा हरण असून, पिनाक प्रणाली भारताला अधिक बलवान व आत्मविश्वासी बनवते.

मागील वर्ष 2025 च्या शेवटच्या काही दिवसात भारताने अनेक क्षेपणास्त्रे, स्वदेशी तंत्रज्ञान अद्ययावत व अत्याधुनिक करून, वाढीव क्षमतांच्या प्रदर्शनासह यशस्वी चाचण्या घेतल्या. आपल्या शेजारील शत्रू देशाच्याच 120 कि मी सुदूर असणारे शत्रुलक्ष्य आपली सीमा न ओलांडता अचूकतेने व नेमके पणाने मारा करून ते नष्ट करण्याची क्षमता मि ळवली. बहुनलीकीय अग्निबाण प्रणाली “पिनाक” याची सुधारित आवृत्ती म्हणजेच “निर्देशित पिनाक” (LRGR-120) याच्या यशस्वी फायरींग चाचण्या ओडिशाच्या बालेश्वर जवळ समुद्र किनारी असणाऱ्या चांदिपूर येथे करण्यात आल्या. याचा परिणाम अतिशय उत्साह वर्धक म्हणजे, सर्व चाचण्या जसे ठरविले तशा, इंग्रजीत “Textbook Precision” म्हणतात तसे मिळाले. त्या सर्वाची मोजदाद करणे आणि प्रक्षेपका पासून सुरू झालेला व शत्रुलक्ष्य भेद होई पर्यंतचा हवाई मार्ग नोंदणे व रेखांकि त करणेसाठी असणारी सर्व संयंत्र (Range InstInstrumen) रचना पूर्णवेळ कार्यरत होती. ही “निर्देशित पिनाक” [Long Range Guided Rocket - (LRGR-120)] प्रणाली एआरडीई या डीआरडीओच्या पुणे येथील महत्वाच्या संस्थेमध्ये विकसित करण्यात आले. “पिनाक” प्रणाली साठी माझेही छोटेसे योगदान असल्याने, या वृत्ताने अभिमानाने छाती फुलली आहे, आणि गगनात आनंद मावेनासा झाला आहे. अगदी “SS- 45” हे जमिनीवरून डागणे व जमि नीवरील (45 कि.मी.) लक्ष्यभेद करणारी प्रणाली विकसित करताना 1980 च्या दशकापासून सुरवात करून “पिनाक-मार्क 1” 39 कि मी पल्ल्यावरील लक्ष्य भेदणारी अग्नि बाण प्रणाली सेवेत दाखल करून भारतीय सशस्त्र सेनेचा तोफखाना विभाग मजबूत केला.


तत्कालीन रक्षा मंत्री मा. अरुण जेटली जी यांना पिनाक क्षेपणास्त्राची माहि ती देताना लेखक
तत्कालीन रक्षा मंत्री मा. अरुण जेटली जी यांना पिनाक क्षेपणास्त्राची माहि ती देताना लेखक

पिनाक प्रणाली संशोधन व विकास कार्यात मुख्य एआरडीई बरोबरच एचईएमआरएल, व्हीआर डी ई यांचा ही सहभाग आहे. टाटा एल ॲन्ड टी, बीईएमएल, प्रक्षेपक उत्पादन तर आयुध निर्माणी, इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह हे अग्निबाण निर्माण व पुरवठा करतात. सर्व वाहने बीईएमएल पुरवते, अशा सर्वांच्या प्रयत्नातून - भारतीय सेनेस मोठ्या प्रमाणावर पिनाक उत्पादन करून पुरवठा केला जातो. सध्या तेरा लष्करी तोफ खान्यांकडे, (Regiments) पिनाक प्रणाली कार्यरत असून पंचवीस लष्करी तोफखान्यांची तयारी सुरु आहे. अशा शस्त्रसिध्द पिनाक तोफखाना उत्तरी व पश्चिम सीमांवर तैनात आहेत. त्या सर्वांची क्षमता “निर्देशित पिनाक” च्या यशस्वितेमुळे वाढणार आहे. या साठी लागणारी निर्देशन व नियंत्रण प्रणाली हैदराबादस्थित आरसीआय या क्षेपणास्त्र विकास तज्ञ संरक्षण संशोधन संस्थेचा मोलाचा सहभाग आहे. त्यामुळेच 120 कि मी पल्ल्यावरील शत्रुलक्ष्य भेद अचूक व नेमकेपणाने करण्याचे शक्य झाले. नाहीतर पल्ला वाढला की अचूकता कमी होते, म्हणून निर्देशित पिनाकची आवश्यक्ता अधोरेखित होते.


या प्रणालीचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे अग्निबाण आपल्याकडे असणाऱ्या प्रक्षेपक वाहनांवरून (Pinak MBRL vehicle) हे सहजतेने कोणाताही बदल न करता डागता येतात. त्यामुळे युद्धभूमी वर कमी वेळात केवळ अग्निबाण बदल करून वेगवेगळ्या पल्ल्याचे अग्निबाण सध्या असणाऱ्या यंत्रणेचाच उपयोग करुन नेमकेपणाने व अचुकतेने शत्रू लक्ष्य डागता, लक्ष्य भेदता येते. या सर्व चाचण्यांच्या नोंदी व मोजमाप करणारी संयंत्र रचना ओडीशाच्या बालेश्वर जवळील चांदीपुर समुद्र किनारपट्टीवर डीआरडीओ ने विकसित केलेल्या दोन संस्था आयटीआर व पीएक्सई यांचे फार मोठे व मोलाचे योगदान असते. या” निर्देशित पिनाक “च्या यशस्वी चाचण्यां नंतर भारताच्या रक्षा मंत्र्यांनी डीआरडीओ च्या शास्त्रज्ञां चे अभि नंदन व कौतुक करताना म्हणले की या प्रणाली मध्ये युध्दाचे परिणाम आपल्या बाजूने फिरवण्याची ताकद (Game changer Technology) आहे. ज्यामुळे महत्वाची शत्रुलक्ष्ये (High Value Targets) निर्देशि त पि नाकच्या टापूत येतात व मारा करणे सहजसाध्य झाले आहे. पिनाक अग्निबाण प्रणालीची महत्वाची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे,

  1. एका प्रक्षेपकावर बारा अग्निबाण, अशा सहा प्रक्षेपक वाहनांची एक तुकडी म्हणजे बॅटरी, साल्व्हो (Salvo) फायरींग मध्ये केवळ 44 सेकंदात 72 अग्निबाण डागण्याची क्षमता व अचुकतेने मारा करून एक वर्ग किलोमीटर क्षेत्रफळा वरील लष्करी ठाणे वा शत्रुलक्ष्य बेचिराख करून नष्ट करण्याची क्षमता.

  2. एका अग्निबाणाचा बॉम्ब म्हणजेच युध्दशीर्ष शंभर किग्रॅ स्फोटके वाहून नेण्याची क्षमता व विविध परीणाम देणारे युद्धशीर्ष उदा. स्फोट करून बॉम्ब फोडल्यावर हजारो तुकडे (fragments) होऊन असंख्य गोळ्यांप्रमाणे लक्ष्यभेद करणारे. दुसरा प्रकार म्हणजे आगी लावणारे, तिसरा भयानक स्फोट घडवून तेथील बांधकाम, इमारती पाडणारे इत्यादी

  3. अतिशय नेमकेपणाने अचूक मारा क्षमता ही निर्देशन प्रणाली ची एकात्मिक चालन, नियंत्रण आणि IRNSS (Indian Reginal Navigation Satellite System) यांच्या एकत्रित प्रयोग केल्याने आहे.

  4. मारक पल्ला (strike range) 120 कि.मी. अचुकता व नेमकेपणाने (High precision) लक्ष्यभेद.

  5. उपलब्ध अग्निबाण प्रकार (Variants) ‘पि नाक -1’ - अनिर्देशित, सुमारे 40 किमी पल्ला, “पिनाक-2” - 70 ते 90 कि मी पल्ला , निर्देशन प्रणाली मुळे सुधारित अचूकता. निर्देशित पिनाक (LRGR-120) - 120 कि मी पल्ला सरस अचूकतेसह.

  6. हे सर्व प्रकारचे अग्नि बाण आपण एकाच सेवेमध्ये असलेल्या प्रक्षेपक वाहनावरून डागता येतात, त्यामुळे रणभूमीवर उपयोग करताना वेगळे जास्तीचे भाग वाढवावे लागत नाहीत. (Inventory, Repairs, spares, Special tools) हाताळणे सोपे झाले आहे.

  7. वाहने- उच्च गतिमानता (High Mobility) असण्यासाठी सर्वच वाहने उदा. प्रक्षेपक वाहने, पुरवठा वाहने, क्रेन, दुरुस्ती वाहने, नियंत्रण कक्ष, रडार असे सर्व प्रकारची आवश्यक वाहने BEML किंवा टाट्रा आणि टाटा यांची एकप्रकारची योजली आहेत. यामुळे “शूट ॲन्ड स्कूट” (Shoot & Scoot) क्षमता.


वरील सर्व बाबींचा विचार करता स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यामुळे भारत अधिक सामर्थ्यशाली व बलवान होण्यामध्ये “आत्मनिर्भर भारत” अभियानाची मोठी भूमिका राहिली आहे. आता आपण आपल्याच देशातील उद्योगांवर अवलंबून असल्यामुळे परावलंबित्व जे अन्यदेशांवर आपण शस्त्रास्त्रे, दारुगोळा, क्षेपणास्त्रे, रडार व अन्य संयंत्र अवलंबून असल्यामुळे कारगिल वेळी भेडसावलेल्या समस्येवर “आत्मनिर्भरता” हेच यशस्वी उत्तर आहे. पिनाकच्या 120 कि मी, पल्ल्यामुळे आणि सेवेतीलच प्रक्षेपकांचा उपयोग यामुळे Survivability, quick deployment आणि reduced logistic footprint शक्य झाले. “हर काम देश के नाम” हा मंत्र घेऊन सर्व घटकांनी देशासाठी कार्य केले तर अजेय भारत विश्व गुरु होणारच.


॥ भारत माता की जय ॥



(लेखक डीआरडीओ (एआरडीई, पुणे) येथून वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून निवृत्त झाले आहेत.)

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page