top of page


खगोलशास्त्राला (ब)’जेट’ गती देणारे अर्थशास्त्र
अंबरीश अनंत पवार १ फेब्रुवारी रोजी देशाचा केंद्रीय अर्थ संकल्प सादर झाला. यंदाच्या अर्थ संकल्पात विज्ञान आणि संशोधन क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद केल्याचे दिसते. विशेषतः अंतराळ क्षेत्रातील भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजनांसाठी आवश्यक असलेली पायाभूत तयारी, संशोधन सुविधा आणि कुशल मनुष्यबळ यावर भर दिल्याचे जाणवते. यंदाच्या अर्थ संकल्पातील अंतराळ संशोधनासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचा आढावा घेणारा हा लेख आहे. (सूर्य) नमस्कार मंडळी! तुम्ही म्हणाल की नुसते नमस्कार म्हणण्या ऐवज


नववर्षाची गुढी: सनातन भारतीय संस्कृतीतील वनस्पतीविज्ञानाची जिवंत परंपरा
डॉ. दिपेश चिकणे या लेखात गुढीपाडव्याच्या गुढीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या जैव-सांस्कृतिक आणि वैज्ञानिक पैलूंचे सखोल विश्लेषण केले आहे. आपण या लेखात पाहू शकता की नीम, आंब्याची पाने, झेंडू, ऊस आणि लाल फुले ही केवळ धार्मिक प्रतीके नसून ऋतूचक्र, पर्यावरण, सूक्ष्मजंतूनियंत्रण, कीटकप्रतिबंध आणि मानवी आरोग्याशी निगडित आहेत. आयुर्वेदीय ग्रंथांतील उल्लेख , जैवरासायनिक संयुगे (Azadirachtin, Mangiferin इ.) आणि आधुनिक संशोधन यांच्या आधारे या परंपरांचे वैज्ञानिक अधिष्ठान स्पष्ट के


‘ब्लॅक बॉक्स’आणि बरंच काही ...!
एअर मार्शल भूषण गोखले या लेखात विमान अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तपास प्रक्रियेचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. उच्च तंत्रज्ञान असूनही अपघात का होतात, याचा शोध घेताना ‘ब्लॅक बॉक्स’ अर्थात डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मंगळूर येथील २०१० च्या एअर इंडिया एक्स्प्रेस अपघाताच्या चौकशीचा अनुभव सांगत तपासकार्य किती गुंतागुंतीचे असते हे अधोरेखित केले आहे. रडार, सेन्सर्स , ELT-DT यांसारख्या आ


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने भारतीय कृषी उत्पादनात वृद्धीच्या अभूतपूर्व संधी
डॉ. मनीषा खळदकर आणि एस. डी. कामत कृषिप्रधान भारत देशातील अर्ध्याहून अधिक जनता उपजीविकेसाठी शेती व पूरक उद्योगांवर अवलंबून आहे. तरीही दुर्दैवाने सध्या शेती हा अतिशय बेभरवश्याचा व्यवसाय झाला आहे. कमी आणि अनियमित आकाराची शेते, अवकाळी पडणारा पाऊस, शेत मालाला मिळणारा बदलता भाव, मातीचा पोत व पिकांवर पडणारा रोगांचा प्रादुर्भाव या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शेतकऱ्याची चिंता, दारिद्र्य , व्यसनाधीनता किंवा कधी कधी आत्महत्या सुद्धा. ज्या युगात तंत्रज्ञान आणि बुद्धीच्या जोरावर भारत ए


मंदिर स्थापत्यकला
श्री अजय कुलकर्णी मंदिर स्थापत्य विशेषतः भारतीय मंदिर शास्त्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन या अनुषंगाने मी माझी भूमिका, अनुभव तसेच माझ्या मंदिरे व ऐतिहासिक वास्तूसंवर्धन कार्यातील जवळपास चार दशकांचा निरीक्षणाचा सारांश इथे मांडत आहे. मुळात वास्तुशास्त्र हे शुद्ध विज्ञान आहे कि केवळ कलाविष्कार यात ठळक मते आहेत व ठळक मतांतरे सुद्धा. पण माझ्या मते आधुनिक शिक्षण पद्धती विशेष करून इंग्रजी राजवटीनंतर प्रचलीत असलेल्या शिक्षण पद्धतीनुसार विविध अभ्यासक्रमांची मर्यादा निश्चित केलेली आढळते. य


आत्मनिर्भरतेमुळे भारत अधिक बलवान
काशीनाथ दामोदर देवधर निर्देशित पिनाक (LRGR-120) अग्निबाणाच्या यशस्वी चाचण्यांमुळे भारताची संरक्षणक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. डीआरडीओच्या नेतृत्वाखाली विकसित झालेल्या या स्वदेशी प्रणालीमुळे १२० कि मी अंतरावरील शत्रुलक्ष्य अत्यंत अचूकतेने, सीमा न ओलांडता भेदणे शक्य झाले आहे. विद्यमान पिनाक प्रक्षेपकांवरूनच हे अग्निबाण डागता येत असल्याने जलद तैनाती, कमी लॉजिस्टिक गरज आणि “शूट अँड स्कूट” क्षमता मिळते. उद्योग, संशोधन संस्था व सेनेच्या समन्वयातून आत्मनिर्भर भारत अभियानाचे हे प्


क्लोन
डॉ. रंजन गर्गे गेल्या महिन्या भरापसून ‘बर्थ पॉड हॉस्पिटल’ मध्ये कामाचा ताण चांगलाच वाढला होता. जवळ जवळ १५० बर्थ पॉड्स वेगवेगळ्या वेळी बालकांना जन्म देणार होते. गेली सहा महिने अंतराळवीर अपर्णा श्रेष्ठी या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ‘फ्रेंडशिप’ मध्ये मोहिमेवरच होत्या. अत्यंत साहसी अशा या अंतराळ वीरांगनेने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत हे आगळं वेगळं असं क्षेत्र निवडलं होतं. श्रेष्ठी यांनी त्यांची मैत्रीण आणि गायनाकॉलॉजिस्ट डॉ. आर्या यांना आपल्या ‘स्तन पेशी’आणि ‘कातडीच्या पेशी’ फ्रेंड


बेल, धोतरा आणि शिव :संतुलनाच्या तत्त्वज्ञानाचा वैज्ञानिक वेध
डॉ. दिपेश रामदास चिकणे महाशिवरात्र हा भारतीय संस्कृतीतील केवळ धार्मिक उत्सव नसून, तो तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय दर्शविणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक संदर्भ आहे. शिवतत्त्व हे विनाशाचे नव्हे, तर रूपांतरण, संतुलन आणि चेतनेच्या उत्क्रांतीचे प्रतीक मानले जाते. या लेखात महाशिव रात्र, शिव पूजेत वा परल्या जाणाऱ्या बेल ( Aegle marmelos ) आणि धोतरा ( Datura spp.) या परस्परविरोधी वनस्पतींच्या माध्यमातून संतुलनाची संकल्पना उलगडण्यात आली आहे. बेल ही सात्त्विक शुद्धता, आ


नोबेल पुरस्कार प्राप्त वैज्ञानिक: सर चंद्रशेखर वेंकट रामन
डॉ. सुधाकर आगरकर सर चंद्रशेखर वेंकट रामन हे विज्ञान क्षेत्रातील एक उत्तुंग असे व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण भारतातच घेतले; तुटपुंजे साहित्य असलेल्या प्रयोगशाळेत आपले प्रयोग केले; अतिशय स्वस्त असे उपकरण वापरून जगाला हादरविणारे संशोधन केले. एव्हढेच नव्हे तर मूलभूत संशोधनाचे महत्त्व देशाला पटवून दिले. अशा एका महान शास्त्रज्ञाची माहिती या लेखात आहे. ज्या तारखेला त्याने रामन परिणामांचा शोध लावला त्याच तारखेला आपण देशभर विज्ञान दिन साजरा करतो. या निमित्ताने रामन


कारंज्याचे रहस्य
श्री विठ्ठल रायगावकर जीवन फुलवणं, टिकवण आणि वाढवण या प्रमुख गुणधर्मा बरोबर पाण्याचे इतर अनेक गुणधर्म आहेत. त्यापैकी बऱ्याच गुणधर्मांचा उपयोग मानवाने स्वतःच्या जीवनाशी संबंधित असलेल्या अनेक क्षेत्रात अगदी प्रयत्नपूर्वक करून घेतलेला आहे. उंच डोंगरावर असलेल्या जलाशयातून डोंगराच्या पायथ्याशी मोठमोठ्या पाईप मधून पाणी आणून विद्युत जनित्राची चक्र फिरवून विद्युत निर्मिती हा असाच मानवनिर्मित अविष्कार आहे. या आणि अशाच प्रकारच्या इतर अनेक उपयोगांबरोबर मनोरंजनासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग


महाऔषधी कोरफड
मनिषा पाटील औषधी वनस्पतीत आरोग्य सुधारणे, रोग बरे करणे व प्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात. महाऔषधी कोरफड हे मानवाला निसर्गाने दिलेले वरदान आहे. सर्वांनाच कोरफडीचे काही गुणधर्म माहिती आहेत. पोटात दुखण्यावर, डोळ्यांच्या विकारावर तसेच केसांच्या सौंदर्यासाठी कोरफडीचा उपयोग भारतीय पूर्वी पासूनच करत आहेत. परंतु रक्तदाब, कॅन्सर, एड्स, मधुमेह यासारख्या अनेक रोगांवर कोरफड उपयोगी आहे. हे आपल्याला माहि ती आहे का? यासाठी कोरफडी बद्दल अधिक माहिती घेणे आवश्यक आहे. जगभरात कोरफडीच्या ३


सेमीकॉन २०२५: भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
श्री संजीव केसकर मराठी अनुवाद: डॉ. रोहिणी कुळकर्णी (पांढरे) दिल्ली येथे सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या “सेमिकॉन 2025” मध्ये ४५ पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जगात एक वेगाने विकसित होणारी अर्थ व्यवस्था म्हणुन आपला देश प्रगती करत आहे. सेमीकंडक्टर (अर्ध वाहक) या क्षेत्रात असलेल्या उपलब्ध संधी पहाता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना राबवून जगभरातील या क्षेत्रातील बलाढ्य कंपन्याना आपल्या देशात व्यवसाय करण्यासाठी योग्य ते वाताव


शैक्षणिक प्रशिक्षणातून सामाजिक व औद्योगिक नवोन्मेषाकडे: भिडे फाउंडेशनचा प्रवास
डॉ. प्रशांत शरद दुराफे शिक्षण प्रसारक मंडळींच्या प्रि. बि. व्ही. भिडे फाउंडेशनची स्थापना १९९७ साली स. प. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास व संशोधनाभिमुख शिक्षणासाठी झाली. आयुर्वेद, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र व वनस्पती उती संवर्धन या क्षेत्रांत प्रशिक्षण, चाचणी व अनुप्रयुक्त संशोधन हे फाउंडेशनचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. आयुर्वेदिक औषधे, पर्यावरणपूरक भस्मनिर्मिती, फळांच्या सालींपासून पेक्टिन व सॅनिटायझर निर्मिती, तसेच सुगंधी रसायनांचे प्रक्रिया प्रमाणीकरण असे अन


विज्ञान शाप की वरदान -भारतीय चिंतन
सुरेश गजानन भागवत भारतीय चिंतनात विज्ञानाच्या विधायक आणि विघातक या दोन्ही बाजूंचा साकल्याने विचार झालेला दिसतो. विज्ञान व त्यावर आधारित स्थानिक आवश्यकतेनुसार तंत्रज्ञान आपल्या देशातही त्या-त्या काळात विकसित होत होते. निसर्गाचे शोषण आणि दोहन यातला संयम त्यात स्पष्ट दिसून येतो. भारतीय चिंतनात आढळून येणाऱ्या या संयमी मार्गावर प्रकाश टाकणारा हा लेख. शालेय जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान शाप की वरदान या विषयावर बोलण्याचा किंवा लिहिण्याचा प्रसंग


लांबलेला पर्जन्यकाळ
अनघा शिराळकर नैऋत्य मोसमी पावसाचे परतणे वायव्य भारतापासून साधारणपणे १५ सप्टेंबर पासून सुरु होते आणि १५ आक्टोबर पर्यंत पूर्ण देशातून तो परत जातो. पण अलि कडच्या वर्षांमध्ये त्याचे परतणे काही दिवसांनी लांबत आहे. त्यातच मोसमी पावसानंतर (post monsoon) निर्माण होणाऱ्या चक्री वादळांमुळे पडणाऱ्या मुसळधार पावसाची भर पडत आहे. शिवाय नैऋत्य मोसमी पावसानंतर ईशान्य मोसमी पाऊस सुरू होतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने २०२५ या वर्षीच्या मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त (above normal) र


शास्त्रज्ञांचे मूल्यमापन आणिदिशाभूल करणारी मोजमापं
डॉ. किशोर पाकणीकर आज विज्ञानाविषयी बोलताना आपण वारंवार आकड्यांचा आधार घेतो—“अमुक शास्त्रज्ञाने किती शोधनि बंध प्रकाशित केले?”, “त्यांच्या लेखांना किती citation मिळाले?”, “त्यांच्या नावावर किती पेटंट्स आहेत?”—अशा प्रश्नांवरूनच आपण बहुतेक वेळा त्या व्यक्तीची उंची ठरवतो. आकडे सोपे असतात; एका नजरेत निर्णय होतो आणि चर्चा झटपट संपते. म्हणूनच विद्यापीठे, निधी देणाऱ्या संस्था, सरकार आणि माध्यमे या आकड्यांना फार वजन देतात. मात्र विज्ञानाची खरी ताकद इतक्या सरळ चौकटीत मावते का? एखाद्या


प्रिऑन्स : बिघडलेली घडी
रोहिणी कुलकर्णी (पांढरे) पेशी ही कर्बोदके, प्रथिने, मेद्ययुक्त पदार्थ आणि न्यूक्लिक ऍसिड अशा चार प्रकारच्या महारेण्णूंपासुन बनलेली असते. केवळ प्राथमिक स्वरूपातील प्रथिनांच्या रचनेत बदल झाल्यामुळे सुद्धा रोग निर्मिती होते याचे प्रिऑन हे एकमेव उदाहरण आहे. प्रिऑन (प्रथिने) हे एक अनंत घड्या असलेले विकृत प्रथिन आहे. आपल्या जीवनात ही प्रथिने मोठ्या प्रमाणात उत्पात घडवून आणु शकतात. प्रिऑन्सची गणना सजीवात केलेली नाही याला मिस्फोल्डेड प्रोटीन (misfolded Protein) असे म्हणतात. हे प्रथिन


स्कॅलिडोफोरा
डॉ. पुरुषोत्तम काळे आपण या पूर्वी पहिले की निर्मो चीपशुक (इकडाय सोझोआ) हा आद्यमुखि मं धील (प्रोटोस्टम्स) एकवंशोद्भवी (मोनोफाय लॅटीक) गट असून त्यात स्कॅलि डोफोरा (ज्यात लोरिसीफेरा, प्रायापुलिडा आणि काय नोऱ्हिन्का संघांचा समावेश होतो) आणि क्रिप्टोव्हर्मिस (ज्यात नेमॅटॉइडा व पॅनआर्थ्रोपोडा या उपगटांचा समावेश होतो) असे दोन उपगट आहेत. स्कॅलि डोफोरा हा समुद्री, छद्म-देहगुही प्राण्यांचा लहान गट निर्मोचनीय (झडून जाणारी) कायटिन या शर्करा बहुवारिकाची कठीण पण लवचिक उपत्वचा, अंतर्मुखावर


संकल्पना बदलांनंतरचा काळ
श्री आनंद घैसास तारे हे जणू दूरचे सूर्यच आहेत, कदाचित त्यांच्या स्वतःच्या ग्रह प्रणालीही आहेत या कल्पनेला ‘वैश्विक बहुलवाद’ असे नाव देण्यात आले होते. या दिशेने केलेल्या संकल्पना प्राचीन काळात, एनाक्सागोरस आणि सामोसच्या अरिस्टार्क स यांनी व्यक्त केल्या होत्या, परंतु त्यांना मुख्य प्रवाहात काही त्या काळात मान्यता मिळाली नाही. युरोपियन पुनर्जागरण काळातील पहिले खगोलशास्त्रज्ञ जिओर्डानो ब्रुनो यांनी त्यांच्या ‘डी ल’इन्फिनिटो युनिव्हर्सो एट मोंडी’ (१५८४) मध्ये तारे हे दूरचे सूर्य आ


न चालता सूर्याचे चालणे
श्री विठ्ठल रायगावकर आपल्या सूर्यमालिकेमध्ये एक ग्रह असा आहे की जिथे सूर्य पश्चिमेला उगवतो. शुक्र ग्रह. हो. शुक्र ग्रहावर सूर्य पश्चिमेला उगवतो. पण पृथ्वीवर मात्र पूर्वेलाच उगवतो. हळूहळू वर येतो आणि पश्चिमेला मावळतो. आपण रेल्वेमधून प्रवास करतो त्यावेळेला खिडकीतून बाहेर पाहिले की झाडी मागच्या दिशेने पळताना दिसतात म्हणजे आपण पुढे जात असतो तेव्हा झाडी मागे जातात. अगदी तसंच आहे पृथ्वीच आणि सूर्याच. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकड
bottom of page
