top of page


केंद्रीय चर्म अनुसंधान संस्था, चेन्नई
नारायण वाडदेकर सीएसआयआर म्हणजे ‘कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’, ही भारतातील एक फार मोठी शासकीय विज्ञान, तंत्रज्ञान संशोधन संस्था आहे. तिच्या अधिपत्याखाली ‘केंद्रीय चर्म अनुसंधान संस्था, संक्षिप्त रूप ‘सीएलआरआय’, ही घटकसंस्था काम करते. सीएलआरआयचे मुख्य कार्यालय तामिळनाडू राज्यातील चेन्नई, पूर्वीचे मद्रास येथे आहे. सीएलआरआय, चामडे आणि चामडी वस्तू निर्मितीसंबंधी संशोधन करते. उत्तम प्रतीच्या चामड्याच्या उत्पादनात मार्गदर्शन आणि मदत करते. सीएलआरआयचे प्रयत्न चर्मोद्य


आपल्या अंगठीतलेसोने आले कुठून?
डॉ. अश्विन पुंडलिक आजकाल सोने महाग तर झाले आहेच, पण सध्या मा पंतप्रधानांनी परकीय चलन वाचविण्यासाठी नागरिकांनी वर्षभर सोनेखरेदी टाळावी असे आवाहन केल्याने सोन्यावर बरीच चर्चा सुरु झाली आहे. न गंजणाऱ्या , काळपट न पडणाऱ्या, चकाकणाऱ्या या पिवळ्या धातूचे आकर्षण मानवाला बऱ्याच प्राचीन काळापासून आहे. भारतात सिंधू संस्कृतीच्या अवशिष्ट शहरांमध्ये काही ठिकाणी सुवर्णालंकार तर काही ठिकाणी सोने वितळवण्यासाठीच्या भट्ट्याही सापडल्याने भारतीयांचे सोन्याचे आकर्षण पाच-सहा हजार वर्षांपासूनचे तरी


पाऊस पडण्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव: जैविक पर्जन्य
डॉ. रोहिणी कुलकर्णी (पांढरे) पाणी हा जीवनाचा मुलाधार आहे. सजीवांच्या शरीरातील ६० ते ७० टक्के भाग पाण्याने भरलेला आहे. सजीवांना जगण्यासाठी पृथ्वीवरील पाण्याचे जलचक्र अविरत फिरण्याची एक नैसर्गिक व अखंड प्रक्रिया सुरू असते. पृथ्वीच्या उत्पत्ती नंतर येथील वातावरण हे सजीवांना जगण्यायोग्य नव्हते पृथ्वीवर सुश्मजीवांची निर्मिती झाली आणि या सूक्ष्मजीवांच्या क्रिया कलपांद्वारे पृथ्वीवरील जीवन प्रक्रिया अविरत सुरू आहे. सूक्ष्मजीव हे चराचर व्यापुन आहेत आणि ते मृदा, जल आणि वायु चक्रात सहभ


धोंड्याचा महिना
विठ्ठल रायगावकर अलीकडे वर्गामध्ये “ काय, नुसता धोंडा आहेस तू. “धोंड्यासारखा बसून राहू नको.’’ वगैरे प्रकारची वाक्य ऐकायला मिळत नाहीत. परंतु आमच्या लहानपणी विद्यार्थ्याला गणित येत नसलं किंवा तो काहीही काम करत नसेल तर वरील प्रकारचे वाक्य नेहमी ऐकायला यायची. धोंडा या शब्दाच्या नशिबाला असा एक काहीतरी वेगळा अर्थ आलेला आहे. धोंडा म्हणजे बिन कामाचा, ज्याचा काही उपयोग नाही असा. विदर्भ आणि खानदेशामध्ये मात्र एका प्रसिद्ध गोड पदार्थाच्या नावा मध्ये धोंडा हा शब्द आलेला आहे बरं. पुरणाचे ध


न प्रकाशता चंद्राचे प्रकाशणे
श्री. विठ्ठल रायगावकर या लेखात चंद्राभोवती गुंफलेल्या लोककथा, पौराणिक संदर्भ आणि वैज्ञानिक माहिती यांचा सुंदर संगम आहे. सुरुवातीला मुल्ला नसरुद्दीन यांची विनोदी कथा सांगितली आहे, ज्यात ते विहिरीतील चंद्राचे प्रतिबिंब खरे मानून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पुढे गणपती आणि चंद्राची कथा तसेच दक्ष प्रजापती, रोहिणी आणि चंद्र यांची पौराणिक कथा दिली आहे, ज्यातून चंद्राच्या कला समजावून सांगितल्या आहेत. लेखात चंद्राचे सांस्कृतिक महत्त्वही अधोरेखित केले आहे—सण, व्रतवैकल्य, पौर्


सूक्ष्मजीवशास्त्रीय विज्ञान कथांचे अद्भुत विश्व !
पुस्तक परीक्षण समीक्षक: डॉ. मुकुंद बोधनकर रंजन गर्गे यांचा ‘डीएनए चा आक्रोश’ हा विज्ञानकथा संग्रह आधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर उभा राहणारा एक वेधक साहित्य प्रयोग आहे. या संग्रहातून विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळतो. सूक्ष्मजीवशास्त्रातील गुंतागुंतीच्या संकल्पना—जसे की क्लोनिंग, जीन एडिटिंग, अवयवरोपण—यांना कथारूप देत लेखकाने भविष्यातील शक्यता आणि त्यातील नैतिक प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत. त्यामुळे हा संग्रह केवळ मनोरंजन करत नाही, तर वाचकाला


उष्णतेतून उमललेली सृजनकथा: निसर्गाच्या जिद्दीची रंगीत कहाणी
डॉ. दिपेश चिकणे मे महिना (वैशाख आणि ज्येष्ठ) उन्हाळ्याचा परमोच्च बिंदू. जणू सूर्य पृथ्वीच्या अधिक जवळ येऊन तिच्या प्रत्येक कणाला आपल्या उष्णतेने स्पर्श करतो. दुपारच्या वेळी आकाश निळ्याशार पण निर्विकार दिसते; एकही ढग नाही, जणू पावसाची आठवण ही विसरलेले. जमिनीवर उष्णतेच्या लाटा तरंगत असतात, दूरवरचे दृश्य धुसर भासते. वाऱ्याची झुळूकही गारवा न देता उष्णतेचीच जाणीव करून देते. झाडांची पाने कोमेजलेली, काही ठिकाणी पूर्ण गळून गेलेली; नद्या आणि ओढे आटलेले; मातीचा सुगंधही कोरडेपणा त हरवले


भारतीय ज्ञान परंपरा : ‘स्व’ भावनेची पुनर्स्थापना
स्व. जयंतराव सहस्रबुद्धे स्मृती व्याख्यान - २०२६ व्याख्याते – श्री. प्रमोद जी बापट माननीय श्री. प्रवीण जी रामदास, प्राचार्य डॉ. माधवराव राजवाडे, सभागृहात उपस्थित अन्य श्रेष्ठ माता-भगिनी आणि सज्जन बंधुंनो, सुरुवातीच्या दोन प्रस्तुतींनी सभागृहातले वातावरण एकदम भावपूर्ण झालेले आहे. माननीय जयंतरावांच्या आठवणी श्री. प्रविणजींनी आपल्यासमोर सर्वांसमोर मांडल्या. मला याबाबत पूर्णखात्री आहे की येथे उपस्थित असलेली जी जी व्यक्ती जयंतरवांना पहिल्यांदा भेटली असेल, त्यांच्या मनात एक चित्रपट


स्वदेशी विमानवाहू युद्धनौका : आय एन एस विक्रांत
काशीनाथ दामोदर देवधर मागच्या वर्षीच्या दिवाळीतील सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 हा दिवस भारतीय इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. कारण भारताचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे दिवाळी गोवा येथे स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आय. एन. एस. विक्रांतच्या नौसैनिकांसमवेत साजरी केली. आय. एन. एस. विक्रांत युध्दनौकेवरून देशाला संबोधित करताना ऑपरेशन सिंदूर मधील शौर्या बद्दल तीन्ही सेनांच्या बहादूर जवानांना वंदन करून स्वदेशी शस्त्रास्त्रा


धृवीय प्रकाश: निसर्गाची किमया
डॉ. सुधाकर आगरकर आपल्या पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण असे दोन धृव आहेत. या धृवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना धृव मात्र स्थिर असतात. हे दोन्ही धृव समुद्राने वेढलेले आहेत. उत्तर धृवाजवळ असलेल्या समुद्राला आर्क्टिक्ट तर दक्षिण धृवाजवळ असलेल्या समुद्राला अंटार्क्टिक समुद्र असे म्हणतात. सूर्य उत्तरायणात असताना अंटार्क्टिक समुद्र तर सूर्य दक्षिणायनात आर्क्टिक समुद्र गोठते. हिवाळ्यात इथे काही दिवस सूर्यदर्शन होत नाही तर उन्हाळ्यात काह ी दिव स सूर्य माव ळतच नाही. अशा


√2 अपरिमेय का आहे?
किरण बर्वे √2 ही संख्या गणितातील एक अत्यंत रोचक संख्या आहे, जी अपरिमेय संख्या या संकल्पनेत येते. प्राचीन भारतातील अनेक गणितींनी यावर विचार केल्याचे पुरावे मिळतात. तसेच प्राचीन ग्रीक गणितज्ञ पायथागोरस यांच्या शिष्यांनी प्रथम √2 ही संख्या अपरिमेय असल्याचे शोधले असाही दावा केला जातो. अपरिमेय संख्या म्हणजे ती दोन पूर्णांकांच्या भिन्नरूपात व्यक्त करता येत नाही. ही संख्या विशेषतः पायथागोरस सिद्धांत मध्ये दिसून येते. जर एखाद्या चौरसाची बाजू 1 असेल, तर त्याचा कर्ण √2 इतका येतो. या सा


भारतीय ज्ञानपरंपरेतील सूक्ष्म विज्ञान
“अक्षय तृतीया आणि हनुमान जयंती : खगोलशास्त्र, आयुर्वेद आणि सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास” डॉ. दीपेश चिकणे भारतीय संस्कृतीतील सण हे केवळ धार्मिक श्रद्धांचे प्रतीक नसून निसर्ग, विज्ञान, आरोग्यशास्त्र आणि सामाजिक व्यवस्थेचा सखोल विचार दर्शवणारे आहेत. वैशाख महिन्यात साजरे होणारे अक्षय तृतीया आणि हनुमान जयंती हे दोन सण भारतीय ज्ञानपरंपरेतील वैज्ञानिक दृष्टीकोनाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जातात. या सणांमध्ये खगोलशास्त्र, आयुर्वेद, पर्यावरणशास्त्र, मानसशास्त्र आणि सामाजिक विज्ञान यांचा सु


जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र संस्था
अनघा शिराळकर जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र संस्था ही आपल्या देशातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. मुलभूत जनुकीय जीवशास्त्राचा अभ्यास करून देशातील सार्वजनिक आरोग्य उत्तम कसे राहील या दृष्टीने ही संस्था कार्य करत आहे. मानवी गुणसूत्रांचा झालेला अभ्यास लक्षात घेता वेगवेगळ्या दुर्मिळ व्याधी दूर करण्यासाठी जनुकीय उपचार पध्दती विकसित करणे, वेळोवेळी येणाऱ्या साथीच्या रोगांसाठी कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंचा जनुकीय अभ्यास करून त्यावर प्रभावी औषधोपचार कसे करता येईल या बाबींचा अभ्या


गणित म्हणजे नक्की काय ?
जगदीश काबरे गणित म्हणजे नक्की काय? संख्या म्हणजे काय? आणि अनुभवाशिवाय गणित कसे उभे राहते? हे प्रश्न प्रथमदर्शनी कठीण वाटतात, पण थोडा विचार केला तर ते प्रश्न कठीण नसतात हे आपल्या लक्षात येईल. गणित म्हणजे केवळ आकड्यांच्या बेरीज-वजाबाकीचे शास्त्र नाही; तर ते त्याहून खूप व्यापक आहे. आपण म्हणतो ते ‘तीन’, ‘दहा ’, ‘शंभर’ हे आकडे स्वतः वस्तू नसतात. ‘तीन’ हा आकडा दिसत नाही; दिसतात त्या तीन वस्तू. उदा. तीन सफरचंद, सात दगड आपण त्या वस्तूंच्या मोजणीतून ‘तीन’ म्हणजे किती, ’सात’ म्हणजे कित


मंदिर: ऊर्जा,वास्तू आणि विज्ञान - दगडात साकारलेली ज्ञानपरंपरा
डॉ. उज्ज्वला खोत भारतीय मंदिर बांधकामात विज्ञान आणि खगोलशास्त्र यांचा अद्भुत संगम दिसून येतो. प्राचीन काळातील वास्तुकारांनी मंदिरांची रचना करताना सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांच्या हालचालींचा सूक्ष्म अभ्यास केला होता. अनेक मंदिरांची दिशा अशी ठरवली जाते की विशिष्ट दिवसांमध्ये, जसे संक्रांती, सूर्यकिरणे थेट गर्भगृहातील मूर्तीवर पडतात. उदाहरणार्थ, कोणार्क सूर्यमंदिर हे सूर्याच्या गतीनुसार उभारलेले असून त्याची रचना एक भव्य रथासारखी आहे. तसेच, मंदिरातील शिखरे, मंडप आणि स्तंभ यांचे प्र


कोरा कागद..काळी शाई…
अनिता जोशी आज मुद्रण तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे लिहिणे, छापणे अगदी सहज आणि सोपे झाले असले, तरी पूर्वी लेखन ही एक अत्यंत कष्टसाध्य प्रक्रिया होती. हस्तलिखिते लिहिताना केवळ अक्षरे उतरवणेच नव्हे, तर कागद तयार करणे, शाई बनवणे आणि लेखनासाठी आवश्यक साधनांची तयारीसुद्धा करावी लागत असे. या साऱ्या प्रक्रियांचा मागोवा घेणारा, लेखनाच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. भावनांच्या अभिव्यक्तीचे साधन म्हणजे शब्द. तीच वैखरी, तिचे चित्रांकन म्हणजे लिपी, आपण उच्चारलेला मजकूर दीर्घकाळ टिकाव


कॅलिडोस्कोपमधील जीवनदर्शन: डॉ. हेमलता दत्तात्रय साने यांचे विज्ञान,साहित्य आणि शाश्वततेचे बहुरंगी विश्व
डॉ वर्षा निंबाळकर डॉ. हेमलता दत्तात्रय साने (१९४०–२०२५) या वनस्पतीशास्त्रज्ञ, समर्पित शिक्षिका, लेखिका आणि पर्यावरणप्रेमी विदुषी होत्या. त्यांच्या कार्याचा आवाका कॅलिडोस्कोपप्रमाणे बहुरंगी असून विज्ञान, साहित्य आणि भारतीय ज्ञानपरंपरा यांचा सुरेख संगम त्यात दिसतो. चार दशके अध्यापन करत त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्राची गोडी लावली. संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्वामुळे त्यांनी विज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवले. शाश्वत जीवनशैली, निसर्गाशी तादात्म्य आणि मा


आपत्कालीन प्रसंगी विमानछत तोडणारी प्रणाली
श्री काशीनाथ देवधर स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ व प्रशिक्षण विमानांसाठी विकसित करण्यात आलेली विमानछत विच्छेदन प्रणाली (कॅनॉपी सेवरन्स सिस्टम – CSS) ही वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची जीवरक्षक यंत्रणा आहे. या लेखात डीआरडीओच्या एआरडीई व एचईएमआरएल संस्थांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानावर आधारित CSS प्रणालीची संकल्पना, रचना व कार्य पद्धती स्पष्ट केली आहे. उड्डाणातील (In-flight) आणि भूतलावरील (Ground) आणीबाणीच्या परिस्थितीत वैमानिकास सुरक


प्रतिबिंब पाहे बिंबातें
विठ्ठल रायगावकर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी अध्यात्मातील विविध संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक अनेक दृष्टांत दिलेले आहेत. “प्रतिबिंब पाहे बिंबातें’’ हा असाच एक विज्ञान क्षेत्रातील दृष्टांत आहे. ह्याचा धागा पकडून आपण बिंब आणि प्रतिबिंब या शब्दांच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू या. आम्हाला लहानपणी दुसरीच्या वर्गात “आरसा हसला आरसा रडला” अशा शीर्षष्घकाचा एक छान धडा होता बालभारतीच्या पुस्तकांमध्ये. तो एक कुणीतरी मुलगा सकाळी उशिरा उठतो आणि पटपट त


एका टँकरची कहाणीआणि पेरूच्या खुट्टीने वाचलेले हजारो जीव
संकॆत रा. वक्ते व डॉ. सुचेता गायकवाड या कथात्मक लेखात मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील प्रोपिलीन वायूच्या टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर विज्ञान, आपत्कालीन व्यवस्थापन आणि निसर्गज्ञान यांची सांगड प्रभावीपणे मांडली आहे. गणेश, त्याचे वडील रासायनिक शास्त्रज्ञ डॉ. देशमुख आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जोशी यांच्या संवादातून प्रोपिलीनचे वैज्ञानिक स्वरूप, त्याचा संभाव्य स्फोटक धोका, गळतीमुळे होणारे तापमानातील बदल आणि फ्रॉस्टबाइटसारख्या जखमा यांचे सुलभ स्पष्टी करण दिले आहे. पेरूच्या लाकडाच्या
bottom of page
