top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

स्वदेशी विमानवाहू युद्धनौका : आय एन एस विक्रांत

  • 18 hours ago
  • 8 min read

काशीनाथ दामोदर देवधर

मागच्या वर्षीच्या दिवाळीतील सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 हा दिवस भारतीय इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. कारण भारताचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे दिवाळी गोवा येथे स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आय. एन. एस. विक्रांतच्या नौसैनिकांसमवेत साजरी केली.

आय. एन. एस. विक्रांत युध्दनौकेवरून देशाला संबोधित करताना ऑपरेशन सिंदूर मधील शौर्या बद्दल तीन्ही सेनांच्या बहादूर जवानांना वंदन करून स्वदेशी शस्त्रास्त्रांमुळे भारताच्या वाढलेल्या ताकदीचा उल्लेख केला व जगात भारताचा जागतिक दबदबा निर्माण झाल्याचे व आत्मनिर्भरतेमुळे झालेल्या महाशक्तिमुळे पाकिस्तानची झोप उडाली असून ते चिंताग्रस्त आहेत. त्याच बरोबर भारतीय नौसेनेचा पराक्रम आणि हिंदी महासागरातील शक्ती संतुलन राखण्यात नौसेनेचे योगदान व महत्व अधोरेखित करताना सुरळीत समुद्री व्यापार व सुरक्षित समुद्री वाहतूक याचबरोबर संकटकाळी नागरीकांना सुरक्षित बचाव करून सोडविणे नौसेना करत आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. गेल्या दहा वर्षात भारतात मोठ्या प्रमाणात स्वदेशी युद्धनौका व पाणबुड्या बनवत असून सध्या चाळीस दिवसात एक याप्रमाणे स्वदेशी युद्धनौका अथवा पाणबुडी, भारतीय नौसेनेत दाखल होत असून नौसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढतच आहे.


“INS विक्रांत” बस नाम ही काफी है।, भारतीय नौसेने ची शक्ती वाढवणाऱ्या INS विक्रांतची माहिती आपण माझ्या या लेखात घेणार आहोत. “भारतीय नौसेना युद्धनौका विक्रांत” या भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे राष्ट्रार्पण सोहळा कोचीन येथे दिनांक 02 सप्टेंबर 2022 या दिवशी पार पडला. भारताचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी जींच्या हस्ते ही महाकाय विमानवाहू युद्धनौका IAC-I (Indian Aircraft Carrier) नौसेनेमध्ये दाखल झाली. सर्व प्रकारच्या हवाई उड्डाण चाचण्या 2023 मध्ये पूर्ण करून आपली ही युद्ध नौसेना भारतीय किनारपट्टी व सुदूर समुद्र याचे रक्षण करण्यासाठी नौसेनेच्या सेवेत दाखल झाली.


महाकाय भव्य दिव्य अशी विक्रांत युद्धनौका कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कोचीन केरळ येथील जहाज बांधणी कारखान्यात प्रथमच बनवली असून अशी क्षमता असणाऱ्या मोजक्या प्रगत देशांच्या पंक्तीत भारत समाविष्ट झाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये सुरुवातीसच हा मोठा प्रकल्प पूर्ण करून एक आत्मनिर्भर भारत अभियानाद्वारे स्वयंपूर्णतेकडे टाकलेले भक्कम पाऊल होय. यामुळे भारताच्या प्रबळ क्षमतांचे दर्शन, भारतीयांची कार्यनिष्ठ बौद्धिक संपदा तथा हुशारी, कार्य प्रेरणा व कार्यक्षमता दिसून येते. विक्रांत हे भारतीयांच्या कौशल्य, भारतीय सामग्री संसाधने आणि दृढनिश्चयाचेच द्योतक आहे.

संरक्षण सामग्री, साधने व संसाधनासाठी तसेच शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे या क्षेत्रातही भारताने स्वयंपूर्णच असले पाहिजे असा आग्रह 1998 मध्ये भारताच्या अणुचाचण्यानंतर जेंव्हा सर्व जगाने भारताला वाळीत टाकले होते, sanctions लावले होते, त्याचवेळी तत्कालीन पंतप्रधान माननीय अटल बिहारी बाजपेयीजी यांनी धरला होता. पंतप्रधान माननीय अटल बिहारी बाजपेयीजी यांच्या सशक्त भारत समर्थ भारत घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वावलंबी भारत संरक्षण क्षेत्रात या भूमिकेची घोषणा तत्कालीन डी आरडी ओ प्रमुख डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी केली. बऱ्याच अंशी संरक्षण तंत्रज्ञान आपल्याला नाकारले जायचे त्यावर उपाय म्हणून स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करायचे धोरण डी आरडी ओ मध्ये सुरू केले आणि अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे, रणगाडे, अणुबॉम्ब, रॉकेट लॉन्चर, रडार, नौदलीय व वायुदलीय शस्त्रास्त्रे अशा सर्व संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान विकसित करून स्वावलंबी बनवण्याचे सूत्र घेऊन DRDO चे कार्य चालू आहे.



आयएनएस विक्रांत या 1961 मध्ये सेवेत दाखल झालेल्या जुन्या भारताच्या ब्रिटिश बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेने 1971 च्या पाकिस्तान युद्धात भारताच्या विजयामध्ये प्रचंड योगदान दिले. ती एकमेव युद्धनौका 1997 मध्ये सेवानिवृत्त झाली. 1999 मध्ये आपली स्वतःची भारतातच तयार केलेली अशी युद्धनौका बनवण्याची इच्छा तत्कालीन प्रधानमंत्री माननीय अटलजी यांनी व्यक्त केली. त्यानुसार प्रकल्प 71 एअर डिफेन्स शिप अर्थात एडी एस अंतर्गत याचे आरेखन व अभिकल्पन सुरू झाले. वॉरशिप डिझाईन ब्युरो अर्थात पूर्वीचे इंडियन नेव्हीचे डायरेक्टरेट ऑफ नेवल डिझाईन या नौसेनेच्या अनुसंधान व विकास विभागाने याचे अभिकल्पन केले. पहिल्यांदा कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) ने 2001 मध्ये त्याचे प्रारूप ग्राफिक इंल्लस्ट्रेशनच्या माध्यमातून दाखविले त्यावेळी बत्तीस हजार टन वजन अपेक्षित होते, परंतु वेळोवेळी त्याच्या क्षमता वाढवत नेऊन ते 45000 टन इतके झाले आहे.

या आयएनएस विक्रांतची क्षमता व भव्यता त्याच्या रचनेवरून आपणास कळून येते. ही युद्धनौका 262.5 मीटर लांब, 62 मीटर रुंद व 59 मीटर उंच अशा भव्य स्वरूपात तयार झाली. तरंगते विमानतळ यावर दोन धावपट्ट्या, एक 144 मीटरची आखूड व दुसरी मोठी 200 मीटर लांबीची ज्यामुळे पाठोपाठ विमाने उड्डाण करू शकतात अशी रचना याच्या वरती केली आहे. एका अर्थाने विक्रांत जहाज हे तरंगते शहर ज्यामध्ये धावपट्या सुद्धा आहेत असे होय. उड्डाण क्षमता वाढावी म्हणून शॉर्ट टेकऑफ बट अरेस्टेड रिकवरी (STOBAR) ही सुविधा ज्याच्यामध्ये हुक आणि वायर्स याची रचना केलेली आहे. म्हणजे विमान उतरताना ते हूक वायर मध्ये अडकणे आणि कमी अंतरावरती विमान थांबवण्याची प्रक्रिया शक्य असते. दुसरे म्हणजे धावपट्टीच्या शेवटी स्कायजंप साठी आठ डिग्रीजचा चढाव असणारा रॅम्प, ज्यामुळे संपूर्ण शस्त्रासह लढाऊ विमान सहजतेने जहाजावरून उड्डाण करण्यासाठी धावपट्टीच्या टोकाला ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. जहाजावरच्या सर्व यंत्रणा, मशीनरी स्वयंचलित पद्धतीच्या अद्ययावत व अत्याधुनिक आहेत. या जहाजावरती एकूण 18 मजले असून हा एक भव्य महाकाय शहर किंवा तरंगता किल्लाच आहे.




मानवाहू युद्धनौका म्हणजे नीलजल शक्ती म्हणजे ब्ल्यू वॉटर पावर मानली जाते. भारत हा स्वदेशी युद्धनौका बनवणाऱ्या देशांच्या गटात सहावा देश झाला आहे. आयएनएस विक्रांतच्या उभारणीत 76% स्वदेशी योगदान असणारी साधने, मशिनरी, लोखंड, पोलाद व बऱ्याचशा उपप्रणाली, प्रणाली व भाग भारतातच बनवलेले आहेत. प्रत्यक्ष जहाज बांधणीचे काम तेरा वर्षे चालू होते कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे मोठे जहाज बांधणी केंद्र असून आवश्यक त्या सर्व सुविधा उदाहरणार्थ ड्राय डॉक यार्ड वगैरे आहेत. रशियाने जहाजासाठी लागणारे विशिष्ट पोलाद देण्याचे नाकारल्यामुळे बराच विलंब झाला, परंतु डी आरडी ओ ने तीन प्रकारचे विशिष्ट पोलाद मिश्र धातू विकसित केले. डी एमआर 249ए, डी एमआर 249बी आणि डी एमआर 249सी असे स्टील ज्याच्यापासून हल, डेक आणि एअर स्ट्रीप फ्लोअर यासाठी लागणारे योग्य पोलाद शोधून काढले, तयार केले व स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात सेल या अंतर्गत बोकारो, भिलई व राऊलकेला पोलाद कारखान्यांनी पुरेशा प्रमाणात उत्पादन करून पोलादाचा पुरवठा केला. 26000 टन स्वदेशी पोलाद वापरून हल, डेक आणि धावपट्टी (एअर स्ट्रीप) तसेच सुपर स्ट्रक्चर तथा एव्हिएशन कॉम्प्लेक्स बनवण्यात आले. मेन स्विच बोर्ड, स्टिअरिंग गिअर, वॉटर टाईट हॅचेस या L&T मुंबई व तळेगाव या कारखान्याने बनवून दिल्या.


एअर कंडिशन व रेफ्रिजरेशन प्रणाली किर्लोस्कर उद्योग समूहाने तर विविध पंप हे बेस्ट (बीईएसटी) व क्रॉम्प्टन कंपनीने बनवले. इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम (आयपीएमएस) ही भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड BHEL कंपनीने बनवून दिले. इलेक्ट्रिक केबल्स या निकोइंडस्ट्रीजने व बरेच अन्य इलेक्ट्रॉनिक प्रणाली एम एस एम इ कारखान्यांनी बनवून दिल्या. या सर्वांची जोडणीचे काम सी एस एल ने पूर्ण केले. विमानवाहू युद्धनौकेचे हल हे 874 मॉड्युलमध्ये बनवले व ते जोडून हल तयार केले यावर एकूण 14 डेक व 18 मजले आहेत एकूण 2300 खोल्या (कंपार्टमेंट्स) आहेत. जहाजावर सर्व मिळून 196 अधिकारी, चौदाशे एकोणपन्नास वायूसैनिक महिला वायूसैनिकांसह राहण्याची व्यवस्था आहे. सर्वांची भोजनाच्या व्यवस्थेसाठी चार मोठे सुसज्ज भोजन मंडप असून मोठ्या प्रमाणावर अन्न बनविण्याच्या सुविधा केल्या आहेत. सहा महिने पुरेल एवढा अन्नसाठा त्याच्यावरती केला जाण्याची क्षमता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या नौदल अधिकारी सैनिक व कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सर्व औषधोपचारासह वैद्यकीय सुविधांची सोय केली आहे. रोज समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी रो Water बनविण्याची 800 टन क्षमतेची यंत्रणा असणारा प्रकल्प तसेच कपडे धुण्यासाठी लॉन्ड्री असणार आहे. या विमानवाहू युद्धनौकेची क्षमता 30 लढाऊ विमाने, 10 हेलि कॉप्टर यासाठी धावपट्टी खालील मोठ्या हँगर ची व्यवस्था केली आहे. तिथेच पार्किंग, सर्व्हिसिंग, तेल, पाणी, दरुुस्ती, इंधन भरणे आदी सुविधा असून आवश्यकतेनुसार विमानावर शस्त्रे, अस्त्रे बसवणे या हँगर मध्येच करतात.


विमानांवर बॉम्ब, शस्त्रे, अस्त्रे, दारुगोळा, क्षेपणास्त्रे ही बसवली जातात, भरली जातात. अशी युद्धसिद्ध लढाऊ विमाने सध्याच्या रचनेनुसार मिग 29 के ही 36 विमाने साठवण्याची व्यवस्था आहे. तसेच के Ka-31, MH - 60 ही हेलिकॉप्टरच्या आवश्यकतेनुसार व्यवस्था करतात. अशी युद्धसज्ज विमाने व हेलिकॉप्टरची धावपट्टीवर ने आण करण्यासाठी सुपर स्ट्रक्चरच्या दोन्ही बाजूस समुद्रदर्शी उद्-वाहक म्हणजे लिफ्टची व्यवस्था केली आहे. कालांतराने भारतीय बनावटीचे लढाऊ विमान एलसीए नेव्ही व ॲडव्हान्स लाईट वेट हेलि कॉप्टर (एएलएच) याचाही समावेश केला जाईल. त्याच्याही चाचण्या चालू आहेत. त्याचबरोबर राफेल-एम याचाही विचार चालू आहे. कमाव थर्टी वन Ka31 हेलि कॉप्टर एअर बोर्न अर्ली वॉर्निंग सिस्टीम रोल यासाठी दहा हेलिकॉप्टर तर सहा वेस्टलँड सी - किंग किंवा मल्टी रोल MH - 60 हेलिकॉप्टर पाणबुडी विरोधी लढाईमध्ये सक्षम व तरबेज आहेत. ही हेलिकॉप्टर पाणबुडी विरोधी लढाई (अँटी सबमरीन वॉरफेअर - एएसडब्ल्यू ) क्षमता असणारी असतील.


45 हजार टन इतक्या पाण्याचे विस्सरण करणाऱ्या या महाकाय व भव्य युद्धनौकेला गतिमान करण्यासाठी खूप शक्तिशाली इंजिनाची आवश्यकता असते ती जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे एल एम LM - 200 प्लस क्षमतेचे चार गॅस टर्बाईन संच, दोन प्रोपेलर शाफ्ट च्या साह्याने कमाल 30 नॉट्स वेगाने म्हणजेच 56 कि लोमीटर प्रति तास गतीने 8000 नॉटि कल माइल्स किंवा पंधरा हजार किलोमीटरपर्यंत एकूण जाता येते म्हणजेच एकदा भारताचा किनारा सोडला तर ब्राझील पर्यंत जाऊ शकते. या गॅस टरबाईन ची एकाची शक्ती 22 मेगावॉट इतकी प्रचंड आहे. यासाठी Elecon या भारतीय कंपनीने उत्पादन केलेल्या सीओजीएजी प्रकारच्या गिअरबॉक्सची जोडणी, गॅस टर्बाईन शाफ्ट व प्रोफेलर शाफ्ट या दोघांचा दुवा बनते असे दोन शाफ्ट आहेत. युद्धनौका विक्रांत वरील सर्व कार्ये सुचारू होण्यासाठी जी विद्युत पुरवठा यंत्रणा आहे व विद्युत उत्पादन यंत्रणा आहे त्यासाठी 14 जनरेटरद्वा रा 24 मेगावॉट प्रति दिन निर्माण करण्याची व्यवस्था आहे. 6000 टन डिझेल साठवण्याची क्षमता, 18 दिवस पुरेल अशी आहे. विक्रांत वर एलईडी दिवे बसवले आहेत त्यामुळे कमी देखभाल व कमीत कमी वीज खर्च आणि जास्तीत जास्त काम अपेक्षित आहे.


आयएनएस विक्रांत 2 सप्टेंबर 2022 रोजी इंडियन नेव्हीमध्ये सुरू झालेल्या भारतातील प्रथम स्वदेशी डिझाइन केलेली आणि बांधली गेली आहे. हि युद्धनौका भारतातील सागरी क्षमता आणि संरक्षण तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबनातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आयएनएस विक्रांतने अरबी समुद्रातील मिलान 2024 बहुराष्ट्रीय नौदल व्यायाम आणि ऑपरेशन सिंदूर यासह विविध आयाम आणि ऑपरेशन्समध्ये भाग घेतला आहे. सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर त्याने संपूर्ण ऑपरेशनल क्षमता देखील साध्य केली आहे आणि ऑगस्ट 2024 मध्ये वेस्टर्न फ्लीटमध्ये प्रवेश केला गेला.


ऑपरेशनल क्षमता:
  1. सागरी सुरक्षा आणि मुत्सद्देगिरी: हिंद महासागर प्रदेशात (आयओआर) प्रोजेक्ट करण्याची भारताची क्षमता वाढवते आणि सागरी मुत्सद्देगिरी आणि आपत्ती प्रतिसाद क्षमता मजबूत करते.

  2. सामरिक महत्त्व: ब्लू वॉटर नेव्ही होण्याच्या भारताच्या महत्वाकांक्षेमध्ये योगदान देते, स्ट्रॅटेजिक चोकपॉईंट्स आणि सी लेनमध्ये अडथळा आणणारा म्हणून काम करतो.

  3. ड्युअल वापर क्षमता: लष्करी भूमिकांमध्ये संरक्षण, हवाई श्रेष्ठता आणि नौदल ऑपरेशन्सचा समावेश आहे, तर सैन्य गैर-भूमिकांमध्ये मानवतावादी मदत, आपत्ती निवारण आणि अडकून पडलेल्या आपल्या व अन्य नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढून ती जागा रिकामी करणे यांचा समावेश आहे. आयएनएस विक्रांत, भारतातील प्रथम स्वदेशी अंगभूत विमान वाहक, त्यामध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.


कार्यरत लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर:

  • 10 हेलिकॉप्टर यासह 30 पर्यंत विमान ऑपरेट करू शकते

  • मिग -2के फायटर जेट्स

  • कामोव्ह -31 हेलिकॉप्टर

  • एमएच -60 आर मल्टी-रोल हेलिकॉप्टर

  • प्रगत लाइट हेलिकॉप्टर (एएलएच)

  • लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) नेव्ही

प्रोपल्शन सिस्टम

  • चार सामान्य इलेक्ट्रिक एलएम 2500 गॅस टर्बाइन्स 80 मेगावाट वीज निर्मिती करतात.

  • वर्धित गती, सुकाणू नौकानयन (maneuverability) आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेसाठी इंटिग्रेटेड प्रोपल्शन कॉम्प्लेक्स (आयपीसी)


साहित्य (Materials)

  • हल आणि फ्लाइट डेक कन्स्ट्रक्शनसाठी डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (डी एमआरएल) द्वारे विकसित केलेले स्पेशल ग्रेड स्टील (डी एमआर -249 ए आणि डी एमआर -249 बी)

  • स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) मधून घरगुती उत्पादित स्टील (बोकारो स्टील प्लांट, भिलाई स्टील प्लांट आणि राउरकेला स्टील प्लांट)

कार्यरत लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर:

  • 10 हेलि कॉप्टर यासह 30 पर्यंत वि मान ऑपरेट करू शकते

  • मिग -2के फायटर जेट्स

  • कामोव्ह -31 हेलि कॉप्टर

  • एमएच -60 आर मल्टी-रोल हेलि कॉप्टर

  • प्रगत लाइट हेलि कॉप्टर (एएलएच)

  • लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) नेव्ही


विमानाचे कामकाज

  • शॉर्ट टेक-ऑफ परंतु अडकवण्याची क्षमता आणि केलेली पुनर्प्राप्ती सिस्टम (Short Take-Off But Arrested Recovery (STOBAR) system) एअरक्राफ्ट लॉन्चसाठी स्की-जंप रॅम्पसह आणि लँडिंगसाठी अडकवण्याची क्षमता असणारी मजबूत दोर यंत्रणा.

  • एल/एम -2248, एमएफ-स्टार, एईएसए आणि सेलेक्स रॅन -40 एल या सारख्या पाळत ठेवणे आणि ट्रॅकिंगसाठी प्रगत रडार यंत्रणा.

सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक्स

  • एल्टा एल/एम -2248 एमएफ-स्टार एईएसए मल्टीफंक्शन रडार

  • सेलेक्स रॅन -40 एल 3 डी एल-बँड एअर पाळत ठेवणारे रडार

  • इलेक्ट्रॉनिक युद्धासाठी डी आरडी ओ शक्ती ईडब्ल्यू सूट

  • कवच अँटी-मिसेल सिस्टम आणि मारीच प्रगत टोरपीडो डिफेन्स सिस्टम.


लढाऊ व्यवस्थापन

  • सुव्यवस्थित जहाज ऑपरेशन्स आणि व्यवस्थापनासाठी एकात्मिक प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्ट म (आयपीएमएस)

  • रणनीति क नीती निर्ण य घेण्यासाठी टाटा प्रगत प्रणालींनी विकसित केलेले कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम (सीएमएस)

पॉवर प्रोजेक्शन आणि डिट्रेन्स

  • भारताला त्याचा प्रभाव सांगण्यास आणि आयओआरमधील राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यास सक्षम करते.

  • सतत उर्जा प्रोजेक्शन आणि वर्धित सागरी सुरक्षेसाठी अनुमती देऊन, भारताच्या नौदल क्षमतांना महत्त्वपूर्ण चालना प्रदान करते.



प्रादेशिक स्थिरता आणि सुरक्षा

  • शेजारच्या राष्ट्रांसह सहकारी सागरी सुरक्षा प्रयत्नांना प्रोत्साहन देऊन प्रादेशिक स्थिरता आणि सुरक्षिततेस योगदान देते

  • या प्रदेशात निव्वळ सुरक्षा प्रदाता म्हणून, विशेषत: वाढत्या चिनी नौदल प्रभावाच्या दरम्यान भारताची स्थिती बळकट करते.

स्वदेशी विकास आणि आत्मनिर्भरता

  • संरक्षण उत्पादन आणि तांत्रिक प्रगतीमध्ये भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे

  • जटिल युद्धनौका डिझाइन करणे आणि तयार करण्याच्या भारताची क्षमता दर्शवते, “आत्मनिर्भर भारत” उपक्रमासाठी आपली वचनबद्धता दर्शवते.

इलेक्ट्रॉनिक युद्ध:

  • इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतांसाठी डी आरडी ओ शक्ती ईडब्ल्यू स्वीटसह सुसज्ज


एकंदरीत, आयएनएस विक्रांत हा भारताच्या सागरी रणनीतीचा एक महत्वाचा घटक आहे, जो हिंद महासागर प्रदेशातील हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी आणि प्रादेशिक स्थिरतेला चालना देण्यासाठी आपली क्षमता वाढवितो.


इतर मुख्य वैशिष्ट्ये:

  • सुरक्षित आणि कार्यक्षम विमान ऑपरेशनसाठी प्रगत एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम

  • उच्च-कार्यक्षमता सहाय्यक शक्ती युनिट्स

  • 874 ब्लॉक्स सह मॉड्यूलर बांधकाम एकत्र सामील झाले

  • 76% स्वदेशी घटक, भारताच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाचे प्रदर्शन करीत आहेत


आयएनएस विक्रांत ही भारतासाठी एक रणनीतिक मालमत्ता आहे, जी त्याच्या सागरी क्षमता आणि संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता वाढवते. त्याच्या धोरणात्मक महत्त्वचे काही महत्त्वाचे पैलू येथे आहेत.


(लेखक - श्री काशीनाथ देवधर, हे DRDOच्या पुणे येथील संशोधन संस्थेतून निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांना दीर्घ अनुभव असून अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.)


 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page