‘कृत्रिम प्रज्ञा आणि भारत’
धनंजय मांडळकर
कृत्रिम प्रज्ञा भारताच्या अर्थव्यवस्था, सार्वजनिक सेवा आणि दैनंदिन जीवनात वेगाने महत्वाची भूमिका बजावत आहे. मोठे तांत्रिक मनुष्यबळ, डिजिटल पायाभूत सुविधा आणि भारतीय भाषांसाठी विकसित होणारी साधने यामुळे भारताला एआय क्षेत्रात जागतिक नेतृत्वाची संधी आहे. मात्र या प्रगतीचा खरा लाभ तेंव्हाच मिळेल , जेंव्हा एआय सर्वांसाठी परवडणारे, सुरक्षित, विश्वासार्ह आणि मानवकेंद्रित असेल.

रोज सकाळी मोबाईल उचलताच, गूगल नकाशा कमी वाहतुकीचा रस्ता सुचवतो, युट्युबवर आवडीचा व्हिडिओ सुचवला जातो, फोटो काढल्यानंतर एआय आपोआप त्याचा प्रकाश, रंग आणि स्पष्टता सुधारून तो अधिक सुंदर बनवते, हवामानाचा अचूक अंदाज तुम्हाला छत्री घ्यायला आठवण करून देतो. या साऱ्यामागे कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान काम करत असते. एकविसाव्या शतकातील हे सर्वात प्रभावी तंत्रज्ञान इतकं रोजचं झालं आहे, कि आपण नकळत ते दररोज सहज वापरतो.
भारतासाठी हि मोठी व्यावसायिक संधी आहेच, पण मर्यादित साधनसंपत्ती असणाऱ्या देशात मोठ्या, तरुण, बहुभाषिक आणि विखुरलेल्या लोकसंख्येपर्यंत अत्यावश्यक सेवा सहज पोहचवण्याचे आव्हान पण आहे. आपल्याकडे मोठा सॉफ्टवेअर उद्योग, वेगाने वाढणारी स्टार्टअप परिसंस्था, वैज्ञानिक संस्था, मोबाईल इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक पेमेंट, आधार या एआय ला पूरक सुविधा आहेत. पण त्याचवेळी आरोग्यसेवा, शिक्षण, शेती उत्पादकता, वाहतूक व शहर व्यवस्थापन, रोजगार आणि सार्वजनिक सेवा वितरणात मोठ्या तफावतीही आहेत. आज आपले मुख्य उद्दिष्ट भारतीय परिस्थितीत प्रत्यक्ष चालेल असं परवडणारं, बहुभाषिक, सुरक्षित एआय कसं बनवायचं हा आहे.
कृत्रिम प्रज्ञेचा इतिहास
कृत्रिम प्रज्ञा म्हणजे माणसाच्या बुध्दिसारखी कामे करणारी संगणक प्रणाली. उदाहरणार्थ भाषा समजणे, चित्र ओळखणे, प्रश्नांची उत्तरे देणे किंवा नवे मजकूर तयार करणे. याच संगणक प्रणालीला आपण एआय मॉडेल म्हणतो. १९५५ साली जॉन मॅककार्थी आणि सहकाऱ्यांनी डार्टमाऊथ प्रकल्पाच्या प्रस्तावात पहिल्यांदाच 'कृत्रिम प्रज्ञा' हा शब्द वापरला आणि अशी कल्पना मंडळी की शिकणे आणि बुद्धीचे पैलू इतक्या नेमकेपणाने समजावून सांगता येतील कि संगणक ते करू शकेल. २०१७ साली गूगल च्या संशोधकांनी ट्रान्सफॉर्मर नावाची नवीन संकल्पना आणली, जी वाक्यातल्या शब्दांचा एकमेकांशी असलेला संबंध ओळखते आणि त्यामुळे संगणकाला खूप वेगाने शिकवता येते. याच रचनेवर आजची सगळी मोठी एआय मॉडेल्स उभी आहेत. त्याच्या पुढच्या वर्षी, २०१८ मध्ये गूगलचे बर्ट (BERT) आणि ओपन एआयचे GPT-1 (Generative Pre-trainined Transformer) हे मॉडेल्स तयार झाले. ओपन एआय (OpenAI) कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये चॅटजीपीटी सर्वांसाठी खुलं केलं आणि आठवड्यातच 'एआय' हा शब्द भारतात आणि जगभर घराघरात पोहोचला.
संधी आणि तिचा पाया
भारताचं मोठं तांत्रिक मनुष्यबळ आणि विस्तृत बाजारपेठ यामुळे जागतिक एआय अर्थव्यवस्थेत आपल्याला महत्वाचं स्थान मिळालं आहे. नॅस्कॉमच्या एका निर्देशांकानुसार सर्वेक्षण केलेल्या ८७ टक्के उद्योगांनी एआय सोलुशन्सचा सक्रिय वापर सुरु केला होता. विशेषतः माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, व्यापार, दूरसंचार आणि ग्राहकसेवा क्षेत्रातच केंद्रित आहे. २०१८ साली नीती आयोगाने राष्ट्रीय कृत्रिम रणनीती प्रकाशित केली, घोषवाक्य होत एआय फॉर ऑल (AI For All). आरोग्यसेवा, शेती, शिक्षण, स्मार्ट शहरे, स्मार्ट वाहतूक या क्षेत्रांना प्राधान्य देण्याचे ठरले. तसेच एआय केवळ मोठ्या कंपनी आणि प्रयोगशाळांच्यापुरते मर्यादित न राहता उपेक्षित घटक आणि छोट्या खेड्यांपर्यंत त्याची व्याप्ती वाढावी यावर भर देण्यात आला.
केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२४ साली ₹१०,३७१.९२ कोटींच्या पाच वर्षांच्या तरतुदीसह इंडियाएआय मिशनला मंजुरी दिली. याचे मुख्य उद्दिष्ट आहे, भारतात एआय तयार करणे आणि भारतासाठी एआय काम करेल असे पाहणे. या मिशनचे सात भाग आहेत, विशेष संगणन साधनांचा सामायिक वापर उपलब्ध करून देणे, भारतीय AI मॉडेल विकसित करणे, आयकोश (AIKosh) मार्फ त माहिती संच उपलब्ध करुन देणे, सामाजिकदृष्ट्या उपयुक्त ऍप्लिकेशन्सना पाठबळ देणे, एआय शिक्षण, फेलोशिप्स आणि डेटा लॅब्जचा विस्तार करणे, स्टार्टअप उद्योजकांना भांडवलाची उपलब्धता करुन देणे, आणि मूल्यांकन, गोपनीयता, आणि इतर जबाबदार एआय कार्याला पाठबळ देणे.
महागडे जीपीयू (GPU) हे आधुनिक एआयसाठी अत्यावश्यक आहेत, पण लहान कंपन्या आणि सर्व विद्यापीठांना परवडतात असे नाही. म्हणून मार्च २०२५ मध्ये स्टार्टअप्स, संशोधक आणि विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात क्लाउड साधने देण्यासाठी इंडियाएआय कॉम्प्टयु पोर्टल (IndiaAI Compute Portal) सुरू करण्यात आले. इंडिया एआय फ्युचरस्किल्स हा उपक्रम अधिकाधिक लोकांना एआय शिकता यावे यासाठी पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि पीएच. डी. स्तरावर एआयचे अभ्यासक्रम वाढवणे, लहान शहरांतील विद्यार्थ्यांनाही पायाभूत प्रशिक्षण मिळावे म्हणून डेटा व एआय लॅब्ज उभारत आहे.
नुकत्याच फेब्रुवारी २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचे आयोजन करण्यात आले. एआयचा विकास आणि वापर करताना नागरिकांचे हित, पर्यावरणाचे संरक्षण आणि सर्वांगीण प्रगती या तीन प्रमुख मुद्द्यांवर या परिषदेत भर देण्यात आला. (Wikipedia contributors (2026), 2026 AI Impact Summit )
भारतीय एआय मॉडल्स, कंपनी आणि भाषा तंत्रज्ञान
भारतजेन (BharatGen) हा एआय उपक्रम भारतातील नामवंत संस्थांनी एकत्र येऊन “भारताकडून, भारतासाठी” या भावनेने देशाची पहिली सार्वभौम एआय घडवण्यासाठी उभारला आहे. या उपक्रमातील मूलभूत एआय मॉडेल्स २२ हून अधिक भारतीय भाषा व बोली तसेच त्यांतील सांस्कृतिक सूक्ष्मता आत्मसात करून त्या भाषांमध्ये संवाद साधू शकतात.
सर्वम एआय (Sarvam AI) ही बंगळुरूस्थित खासगी कं पनी असून इंडियाएआय फाउंडेशन-मॉडेल कार्यक्रमांतर्गत निवडली गेली. मार्च २०२६ मध्ये कंपनीने ये सर्वम-30B आणि सर्वम-105B ही दोन तर्क शक्ती एआय मॉडेल्स प्रसिद्ध केली. ही दोन्ही मॉडेल्स इंडियाएआय मिशनमार्फत पुरवलेल्या संगणन क्षमतेचा वापर करून भारतातच विकसित केली आहे.
AI4Bharat ही आयआयटी मद्रास येथील एक संशोधन प्रयोगशाळा भारतीय भाषांसाठी एआय तंत्रज्ञान विकसित करून ते सर्वांना मोफत वापरता येईल अशा खुल्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी समर्पित आहे. या प्रयोगशाळेने आजवर अनेक डेटासेट्स, साधने आणि अत्याधुनिक मॉडेल्स तयार करून सर्वांसाठी खुली केली आहेत. कृत्रिम एआय लॅब्स (Krutrim AI Labs) ही ओला समूहाने सुरू केलेली भारतातील अत्याधुनिक एआय संशोधन प्रयोगशाळा आहे. भारतातील संगणकीय पायाभूत सुविधांचा वापर करून जागतिक दर्जाची एआय मॉडेल्स विकसित करणे आणि ती सर्वांना मोफत वापरासाठी उपलब्ध करून देणे, हा तिचा उद्देश आहे. कंपनी, संशोधक आणि स्टार्टअप्सना परवडणाऱ्या दरात एआय सेवा देताना त्यांचा डेटा भारतातच सुरक्षित ठेवणारे स्वदेशी क्लाउड तंत्रज्ञानही कृत्रिम उपलब्ध करून देते.
भारतात २२ च्या आसपास भाषा आणि अनेक बोली बोलल्या जातात. आपण एकाच वाक्यात दोन भाषा मिसळून बोलतोही. भाषिणी (BHASHINI) हा राष्ट्रीय भाषा भाषांतर अभियानांतर्गत २०२२ साली सुरू झालेला उपक्रम असून, तो वाणी ओळख (speech recognition), भाषांतर, मजकूर-ते-वाणी (text-to-speech) आणि संबंधित भाषा-सेवा पुरवतो. सरकारच्या २०२६ मधील माहितीनुसार या मंचावर २२ भाषांमध्ये आवाज-सेवा, ३६ भाषांमध्ये मजकूर-सेवा प्रदान करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक सेवांमधील एआय
शासकीय यंत्रणा एआयचा उपयोग कागदपत्रांची प्रक्रिया, माहितीचे भाषांतर, तक्रारींचे विश्लेषण, वाहतूक नियोजन, फसवणूक शोध, तसेच पाणी, कचरा व्यवस्थापन, आरोग्यसेवा आणि शेती-नियोजन यांसाठी करू शकतात. आवाज-आधारित प्रणाली आणि प्रादेशिक भाषांतील इंटरफे समुळे नागरिकांना कल्याणकारी योजना, शिक्षण, आरोग्य आणि अधिकृत कागदपत्रांविषयीची माहिती, लांबचा प्रवास न करता किंवा इंग्रजीत गुंतागुंतीचे अर्ज न भरता, सहज मिळू शकते.
याचे एक ठोस उदाहरण म्हणजे दिशा २.० (DISHA 2.0), या योजनेतील नवा विधी-संजीवनी (VIDHISanjeevani) घटक एक केंद्रीय डिजिटल मंच म्हणून तयार केला असून, त्यात भाषिणीच्या सहकार्याने विकसित केलेला, कायदेशीर प्रश्नांसाठीचा बहुभाषिक व एआय-आधारित न्याय सेतू (Nyaya Setu) चॅटबॉट समाविष्ट आहे
आरोग्यसेवेतील एआय

भारतात तज्ज्ञ डॉक्टर आणि निदान सुविधा समान प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांत, आरोग्यसेवा हे एआयच्या वापरासाठी सर्वाधिक आशादायक क्त्रांपैकी एक आहे. क्ष-किरण, MRI यांसारख्या वैद्यकीय प्रतिमांचे परीक्षण, रुग्णांच्या नोंदींचे व्यवस्थापन आणि तातडीने उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांची ओळख यांसाठी एआयचा उपयोग करून मर्यादित तज्ज्ञ सेवांची व्याप्ती वाढवता येऊ शकते.
भारतासाठी आरोग्यसेवेतील कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण (SAHI) हे नवकल्पनांवर आधारित AI तंत्रज्ञानाचा वापर वाढवून भारताची आरोग्यव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. आरोग्यसेवेत जबाबदार आणि पुराव्यावर आधारित AI नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, आरोग्यविषयक परिणाम सुधारणे, आरोग्यसेवा अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आणि आरोग्यव्यवस्थेची कार्यक्षमता वाढवणे ही या धोरणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
(Picture Credit: Strategy for Artificial Intelligence in Healthcare for India (SAHI))
शेतीतील एआय
शेतीसाठी एआय चा सल्ला स्थानिक भाषा, हवामान, माती, पीक आणि शेतकऱ्याचे नेमके स्थान यांना अनुरूप असणे आवश्यक आहे. कृषी मंत्रालयाचा ‘किसान ई-मित्र’ चॅटबॉट पीएम-किसान योजनेशी संबंधित प्रश्नांची अनेक भाषांत उत्तरे देतो. राष्ट्रीय कीड सर्वेक्षण प्रणाली तसेच उपग्रह, हवामान आणि मृदा आर्द्रतेचे एआय-आधारित विश्लेषणही मंत्रालयाच्या उपक्रमांचा भाग आहे. खासगी क्षेत्रात बेंगळुरूची Cropin कंपनी उपग्रह प्रतिमा आणि हवामान माहितीच्या मदतीने पीक आरोग्य, उत्पादनातील जोखीम, मालाचा मागोवा आणि पुरवठा साखळीचे नियोजन यांसाठी डिजिटल सेवा देते. (Ministry of Agriculture & Farmers Welfare, India)
शिक्षणातील एआय
प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या गतीने शिकतो, मग सर्वांना एकाच पद्धतीने का शिकवायचे? एआय धड्यांचे भाषांतर करू शकते, कठीण संकल्पना सोप्या भाषेत समजावू शकते, सराव प्रश्न व अभिप्राय देऊ शकते आणि शिक्षकांना धड्यांचे नियोजन करण्यात मदत करू शकते. मोठे वर्ग, शिक्षकांची कमतरता असलेले भाग आणि शाळेनंतरची अतिरिक्त मदत यांसाठी ते विशेषतः उपयुक्त ठरू शकते. याचे एक उदाहरण म्हणजे ‘शिक्षा कोपायलट’ (Shiksha copilot). मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया आणि शिक्षण फाउंडेशन यांनी विकसित के लेला हा प्रकल्प सरकारी शाळांतील शिक्षकांना इंग्रजी आणि कन्नड भाषेत धड्यांचे नियोजन करण्यास मदत करतो. बेंगळुरू परिसरात त्याची प्रायोगिक चाचणी झाली. विद्यार्थ्यांनीही पुस्तके वाचणे, स्वतंत्रपणे लिहिणे आणि चर्चेत सक्रिय सहभाग घेणे सुरू ठेवले पाहिजे.
बँकिंग, व्यवसाय आणि उद्योगातील एआय
बँका आणि वित्तीय कंपन्या फसवणूक शोधणे, कागदपत्रांवर प्रक्रिया करणे, ग्राहकांना मदत करणे आणि आर्थिक जोखमीचे विश्लेषण करणे यासाठी एआयचा वापर करतात. एआय मानवी तपासणीपेक्षा अधिक वेगाने असामान्य व्यवहार आणि संशयास्पद नमुने ओळखू शकते. सेबीने २०१९ पासून बाजारातील मध्यस्थ संस्थांना त्यांच्या एआय वापराची माहिती देणे बंधनकारक केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमनाखालील संस्थांसाठी ऑगस्ट २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या FREE-AI समितीच्या अहवालात एआयचा जबाबदारीने वापर करण्यासाठी शिफारशी मांडण्यात आल्या. किरकोळ विक्री, वाहतूक, उत्पादन आणि लघुउद्योगांमध्ये एआयचा वापर मागणीचा अंदाज, साठा व पुरवठा साखळी व्यवस्थापन, मार्ग नियोजन, यंत्रांची देखभाल, ग्राहक सेवा, जाहिराती, कागदपत्रे आणि फसवणूक शोधण्यासाठी केला जातो. भारतातील खाजगी कंपनी arya.ai आणि locus.sh ही त्याची उदाहरणे आहेत.
सार्वजनिक वाहतुकीतील एआय
वाहतूक क्षेत्रात एआयचा वापर अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी वाढत आहे. जीपीएस, कॅमेरे आणि सेन्सरमधील माहिती एकत्र करून एआय वाहतूक व्यवस्थापन, प्रवाशांना माहिती देणे आणि शहरी वाहतुकीपासून रेल्वे तपासणीपर्यंत अनेक कामांत मदत करत आहे. मार्च २०२६ पर्यंत भारतीय रेल्वे विविध तपासणी कामांसाठी एआयचा वापर करत होती. कॅमेऱ्यांच्या मदतीने मालगाड्यांवरील सैल किंवा खराब भाग ओळखणे, रुळांमधील दोष शोधणे आणि रेल्वेच्या वरच्या विद्युत उपकरणांची ड्रोनद्वारे तपासणी करणे ही त्याची काही उदाहरणे आहेत. ड्रोन तपासणी प्रणाली आयआयटी मद्रासच्या सहकार्याने विकसित केली जात होती.
संरक्षण आणि सुरक्षेतील एआय
संरक्षण क्षेत्रात एआय उपग्रह, ड्रोन आणि रडारमधून मिळणारी माहिती तपासून संशयास्पद हालचाली ओळखणे, त्यांचा मागोवा घेणे आणि योग्य वेळी निर्णय घेण्यास मदत करू शकते. भारतात DRDO प्रतिमांचे विश्लेषण, उपग्रह सेन्सरमधील माहिती समजून घेणे, आकाशातील लक्ष्ये ओळखणे आणि मानवरहित वाहनांमध्ये समन्वय साधणे यासाठी एआयवर संशोधन करत आहे.
हवामान आणि वातावरण सेवेतील एआय
भारताच्या हवामान संस्था आता पारंपरिक अंदाज पद्धतींसोबत एआयचाही वापर करत आहेत. आयएमडी चक्रीवादळाची तीव्रता मोजण्यासाठी प्रगत ड्वोर्याक तंत्र (Advanced Dvorak Technique) वापरते, तर एनसीएमआरडब्लए्यू फने अरुणिका महासंगणकावर GraphCast, Pangu-Weather, यांसारखी जागतिक एआय हवामान मॉडेल्स जोडली आहेत. दिल्ली- एनसीआरसाठी विकसित केलेले हे भारतीय पर्जन्य मॉडेल MeteoGAN सुमारे ३०० मीटर इतक्या सूक्ष्म स्तरावर पावसाचा अंदाज देण्यासाठी चाचणी करण्यात आले आहे. आयएमडी शेतकऱ्यांपर्यंत हवामान माहिती त्यांच्या भाषेत पोहोचवण्यासाठी भाषिणीचाही वापर करते. हा वापर माहितीचा भाषिक प्रवेश सुधारण्यासाठी आहे, हवामानाचा अंदाज तयार करण्यासाठी नाही.
एआय वापरातील जवाबदारी आणि नियमन
२०२५ मध्ये भारताने एआयच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यात लोकांचे हित, विश्वास, न्याय, जबाबदारी, स्पष्टता, सुरक्षितता आणि पर्यावरणाचा विचार यांना महत्त्व देण्यात आले. जबाबदारीमुळे नवकल्पना थांबत नाहीत. उलट निर्णय कसा घेतला, चूक कुठे झाली आणि तक्रार कुठे करायची हे स्पष्ट असेल, तर लोकांचा विश्वास वाढतो. लोकांना प्रश्न विचारता येत नसतील, तर अशा प्रणालीवर विश्वास ठेवणे कठीण होते.
एआय संबंधित रोजगार आणि भविष्यातील कौशल्ये

काही वारंवार करावी लागणारी आणि फारसे तांत्रिक कौशल्य न लागणारी कामे एआय स्वतः करू शकते, तर इतर कामांत माणसाचा वेळ आणि मेहनत कमी करू शकते. माहिती भरणे, नेहमीची कागदपत्रे तयार करणे, नोंदी तपासणे आणि साधे अहवाल बनवणे यांसारख्या कामांमध्ये त्यामुळे मोठा बदल होऊ शकतो. काही नोकऱ्या कमी होतील, अनेक नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल आणि काही नवीन भूमिका निर्माण होतील. त्यामुळे डिजिटल कामांच्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या तरुणांसाठी हा बदल अनिश्चित आणि आव्हानात्मक ठरू शकतो. भारतासाठी हा विषय विशेष महत्त्वाचा आहे, कारण बीपीओ आणि सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रात मोठ्या संख्येने लोक क ये ाम करतात. त्याच वेळी एआय अभियांत्रिकी, सायबर सुरक्षा, मॉडेल तपासणी आणि डिजिटल शिक्षण यांसारख्या क्त्रांत नवीन संधी व षे ाढत आहेत. मात्र एखाद्या क्त्षे राचे प्रत्यक्ष ज्ञान अजूनही तितके च महत्त्वाचे राहील. उदाहरणार्थ, एआयचे निष्कर्ष तपासणारी परिचारिका, स्वयंचलित पुरावे समजणारा वकील किं वा शेतकऱ्यांसाठी एआयचा सल्ला पडताळणारा कृ षी तज्ज्ञ यांची भूमिका अधिक महत्त्वाची असेल. भविष्यासाठी चिकित्सक विचार, स्पष्ट संवाद, डिजिटल सुरक्षा आणि योग्य-अयोग्याचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता ही कौशल्ये महत्त्वाची ठरतील. कामगारांना के वळ प्रमाणपत्र देणारे छोटे अभ्यासक्रम नव्हे, तर प्रत्यक्ष कामाचा सराव हवा. एआयशी विचारपूर्वक काम करणारे लोक, त्याच्याशी फक्त स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपेक्षा पुढे राहतील.
एआयसह भारताचं भविष्य
जागतिक एआय क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी भारताकडे मोठे कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान कंपन्या, संशोधन संस्था, डिजिटल पायाभूत सुविधा यांसारख्या अनेक महत्वाची बलस्थाने आहेत. आणि एआयच्या मदतीने सोडवता येतील अशा अनेक प्रत्यक्ष समस्या देशात आहेत. भारत आता केवळ एआय वापरणारा देश राहिलेला नाही, तर स्वतःची मॉडेल्स, डेटासेट्स आणि धोरणे तयार करण्याच्या दिशेनेही पुढे जात आहे. इंडियाएआय मिशनने संगणकीय सुविधा, डेटा, कौशल्य विकास आणि एआय सुरक्षितता यांना एकत्र जोडणारी चौकट उभी केली आहे. भाषिणी, भारतGen, AI4Bharat आणि सर्वम यांसारखे उपक्रम भारतीय भाषा आणि भारतातील लोकांच्या गरजांसाठी एआय विकसित करण्याचे प्रयत्न दाखवतात.
भारत अजूनही परदेशातून येणाऱ्या चिप्स आणि विदेशी क्लाउड तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. संशोधनासाठीचा निधी सर्व संस्थांना समान मिळत नाही. ग्रामीण भागातील इंटरनेट, उपकरणांची किंमत, डिजिटल साक्षरता आणि स्त्री-पुरुषांमधील विषमता यांवर कोणाला डिजिटल सेवा वापरता येतील हे ठरते. मोठ्या डेटा सेंटर्सना मोठ्या प्रमाणावर वीज आणि पाणी लागते. त्यामुळे अधिक कार्यक्षम तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जेचा वापरही महत्त्वाचा आह भारताची खरी संधी अनेक भारतीय भाषांत काम करणाऱ्या आणि लोकांना विश्वासाने वापरता येतील अशा प्रणाली विकसित करण्यात आहे. तसेच आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी खरोखर सुधारतात का आणि त्यासाठी लोकांचे हक्क धोक्यात येत नाहीत ना, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
भारत एआय वापरणार की नाही, हा प्रश्न आता उरलेला नाही. भारत आधीच एआयचा वापर करत आहे. खरी कसोटी ही आहे की एआयमुळे विषमता कमी होते का, कामगारांना मदत मिळते का आणि कोणतेही समुदाय मागे राहतात का? भारताचे एआय भविष्य सर्वसमावेशक, परवडणारे, सुरक्षित आणि मानवकेंद्रित असले पाहिजे. ते भारतीय भाषांत काम करणारे, ग्रामीण व कमी उत्पन्न असलेल्या समुदायांपर्यंत पोहोचणारे, वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणारे आणि मानवी जबाबदारीची जागा घेण्याऐवजी तिला अधिक दृढ करणारे असावे.
(लेखक जर्मनीतील डॉर्टमुंड विद्यापीठात एआयचा कर्करोग संशोधनामध्ये कार्यरत आहेत.)

Comments