मुंबईचा पाणी प्रश्न: त्वरित काही प्रमाणात कमी करण्याची योजना - विष्णू. अ. जोशी

आता मुंबईला धरणातील साठवलेल्या पाण्यातून पाणी दिले जाते. मुंबईची पाण्याची मागणी वाढत आहे. नवीन जमीन घेउन धरण बांधून पाण्याची क्षमता वाढविणे याला बराच वेळ व पैसा लागणार आहे. आता कुठलीही नवीन जमीन न घेता त्वरित पाणी क्षमता वाढविण्याची योजना मला सुचली आहे.
५०-६० वर्षांपूर्वी मुंबईतील उपनगरात पत्र्याची छप्परे असलेली घरे होती व विहिरीचे पाणी वापरत. तेंव्हा पावसाळ्यात पन्हाळी खाली एक पिप ठेवत. पिपातील पावसाचे पाणी ब-याच कामासाठी वापरत असत. मुंबईत शेकडो स्क्वेअर कि.मि. वर रेल्वेचे जाळे आहे. त्याच्यावर पावसाळ्यात दरवर्षी ३ मि.येवढे पावसाचे पाणी पडते व ते सर्व पाणी समुद्रात वाहून जाते. रेल्वे यंत्रणेला ब-याच कामासाठी पावसाच्या रूळा वरील पुनर्भरण केलेले पाणी तसेच वापरणे शक्य आहे. रेल्वे यंत्रणेने असे पाणी पुनर्भरण शक्य आहे व तेथे वापरले तर धरणातील पाण्याची बरीच बचत होऊ शकेल. रुळावर पडण्या-या पाण्याचे पुनर्भरण करण्याची योजना मी केली आहे.माझी योजना मी चार रूळांचा विचार करून रेखा चित्रात मांडली आहे.जास्त रूळ असले तेथे योजना वाढविणे सोपे आहे.माझी योजना खालील प्रमाणे आहे.

R1,R2,R3,R4 हे रेल्वे रूळ आहेत. T-हे ७०० मिमी व्यास व १५००उंचिचे लोखंडी सळ्या वापरून केलेले सिमेंटचे टँक आहेत.ते जमिनीत R1-R2 व R3-R4 मध्ये ३००-४०० मि.अंतरावर जमिनिशी समांतर बसवले आहेत. R2-R3 मध्ये १०० मिमी व्यासाचा प्लॅस्टिक पाईप आहे. त्यात पंपाने आलेले पाणी एका मोठ्या सिमेंट टाकीत पडते. टाकीला पाणी पंप व लिमिट स्वीच आहे व पंपाने पाणी योग्य ठिकाणी नेले जाते.
P- हे पाण्यात मातीचे कण असले तरी पाणी पंप करू शकणारे पंप आहेत व त्याना आपोआप चालू व बंद होणारे लिमिट स्विचेस बसवले आहेत. पाउस सुरु झाला की पावसाचे पाणी रुळावरून मधील जागेत वहायला लागेल. ते पाणी सिमेंट टाकीत पडेल व योग्य उंची पर्यंत पाणी भरले की लिमिट स्विचेस पंप चालू करतील व पावसाचे पाणी प्लॅस्टिक पाईप मध्ये पंप केले जाइल. ते पाणी जमिनीत बसवलेल्या टाकीत पडेल.तेथून ते पाणी पंप व लिमिट स्विच असलेल्या पंपाने ते जरूर तेथे नेले जाईल. रेल्वेकडे पाण्याचे शेकडोनी टँकर आहेत व पावसाळ्यात ते वापरात नसतात. मुंबईत काही वेळा खूप पाउस पडतो.तेंव्हा पुनर्भरण केलेले पाणी टँकर मध्ये साठवले जाईल व गरजे प्रमाणे वापरता येईल.
रेल्वे वर्कशॉपच्या बाजूला खूप रेल्वे लाईन्स असतात.रेल्वे यंत्रणेने सर्व रूळावरील पाण्याचे पुनर्भरण केले व ते वापरले तर तर पावसाळ्यात महानगराच्या वापरत असलेल्या पाण्यात बरीच बचत होईल.
माझ्या योजनेत खालील सुधारणा करणे जरूर आहे -
· दोन रुळा मधील जागेतील पाणी समुद्रात झिरपू नये म्हणून दोन रुळामधील जागेत कॉंक्रीटींग करणे
· रुळाच्या बाजूची सरळ व तिरपी जागा आहे तेथे १-२ मि.मि जाडीचे प्लॅस्टिक तक्ते योग्य आकार देऊन बसविणे.ते वा-याने उडू नयेत म्हणून एकमेकाला बांधणे.
· दोन रूळामधील जागेत योग्य मायक्रॉन जाडीचे प्लॅस्टिक घालणे व त्यावर प्लॅस्टिक उडू नये म्हणून पट्ट्या ठेवणे.रूळा मधील जागेत ४ मिमी व्यासाचा व रुळाच्या रुंदीपेक्षा जास्त लांब असलेला व छिद्रे असलेला पाईप छिद्रे वर करून ठेवणे.त्याचे टोक रूळा खालून काढून प्लॅस्टिक तक्त्यावर वर सोडणे .पावसाचे पाणी प्लॅस्टिक वर पडेल. थोडे पाणी साचले की पाणी छिद्रातून रूळा खालून गेलेल्या पाईप मधून तिरप्या प्लॅस्टिक तक्त्यावर वर पडेल व मग सिमेंट टाकीत जाईल.
आपण १०० मीटर लांब व १० रेल्वे लाईन्स असलेल्या रेल्वे यार्डाचा विचार करू या
मी १० रेल्वे लाईन्स ३० मीटर जागा व्यापतील असे गृहीत धरतो (प्रत्यक्ष अंतर मला माहित नाही) त्या जागेचे क्षेत्रफळ १००X ३०= ३००० स्क़्वेर कि.मि. होईल. लाईन्स १-२,२-३,३-४,४-५ व ६-७,७-८,८-९.९-१० मध्ये योग्य अंतरावर ८ X३=२४सिमेंटच्या टाक्या व पाणी पंप बसवले जातील. लाईन ५-६ मध्ये प्लॅस्टिक पाईप बसवला जाईल व पाउस सुरु झाल्यावर सिमेंट टाकीत जरूर तेवढे पाणी भरल्यावर पंप चालू होतील व सर्व पंप ५-६ मधील पाईप मध्ये पाणी पंप करतील. जर आपण मुंबईत पावसाळ्यात ३मि पाउस पडतो असे गृहीत धरले तर आपण टाक्या बसवलेल्या जागेवर पावसाळ्यात 3०००X३X१०००= ९०,००,००० लिटर पाउसाचे पाणी पडेल.
माझ्या योजनेनुसार जर फक्त टाक्या व पंप बसवले तर ५०% पाणी मिळेल व सुधारणा केल्यावर ९०% पाणी मिळेल.
ज्या मार्गा वरून माणसे असलेल्या गाड्या जात असतात तेथील पावसाचे पाण्याचे पुनर्भरण करू नये कारण त्या पाण्यात घाण (मलमूत्र) असण्याची शक्यता आहे.
माझी योजना वापरून मिळालेले पाणी खालील ठिकाणी वापरणे शक्य आहे -
१) रेल्वे वर्कशॉप. मुंबईत तीनही रेल्वेंची बरीच वर्कशॉप आहेत.
येथे बरेच रूळ असतात व तेथील पाण्याचे पुनर्भरण केले तर वर्कशॉप मध्ये पावसाळ्यात ब-याच कामांना हे पावसाचे पाणी वापरता येइल.
२) रेल्वेच्या गाड्या धुण्याच्या बाजूचे रेल्वे यार्ड.
येथे बरेच रूळ असतात व पावसाचे पाणी वापरणे शक्य आहे.
३) स्टेशन जवळ रूळ असतात जेथे माणसांच्या गाड्या जात नाहीत.तेथील पाणी स्टेशन वरील काही कामासाठी वापरता येइल.
योजनेची वैशिष्टे -
१) या योजनेला नवीन जमीन लागत नाही.
२) योजना यंदाच्या पावसाळ्यात चालू करता येईल.
३) भांडवली खर्च एकदाच लागतो.
४) जेच्या बिलाचा खर्च व दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला सर्व पंप वगैरे जोडणे व नन्तर काढूनठेवण्याचा खर्च .
५) समुद्रात वाहून जाणारे पाणी उपयोगात आणले जाइल.
६) आताच्या पाण्याची योजनेला मदत होईल.
सदर योजना गोदया (PORTS) येथेही वापरता येईल.

Comments