top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

आवृत्तबीजी वनस्पतींचे वर्गीकरण - डॉ. पुरुषोत्तम काळे

  • Apr 11, 2025
  • 3 min read

Updated: May 20, 2025

जगभरातील रेण्विय शास्त्रज्ञांनी सार्व मताने एक नूतन वर्गीकरण पद्धती बनवली आहे. शास्त्रज्ञांच्या या गटाचं नाव अँजियोस्पर्म फायलोजेनी ग्रुप (आवृत्तबीजी वंशैतिहास गट) असल्याने या पद्धतीला एपीजी पद्धत म्हणतात. ही पद्धत रेण्विक साम्य व भेद यांवर बेतलेली असल्यामुळे ती अत्यंत विश्वासार्ह व तंगडी आहे. या पद्धतींमध्ये सुधारणा होत एपीजी १, २, ३ व ४ बनत गेल्या आहेत. एपीजी-४ नुसार आवृत्तबीजीं मध्ये ६४ गण आणि ४१६ कुले आहेत.


आवृत्तबीजी हा काटेकोरपणे व्याख्खित गट असून जीला अपुष्पी वा सपुष्पी कोणत्या गटात घालावे याची शंका यावी अशी कोणतीच वनस्पती अस्तित्वात असणाऱ्या वा नसणाऱ्या वनस्पतींमध्ये नाही. या दोन गटांना जोडू शकेल असा दुवा अगदी अश्मीभूत वनस्पतींमध्येही आढळलेला नाही. आपण पूर्वी च्या लेखात आवृत्तबीज वनस्पतींचे ठळक गुणधर्म पहिले आहेत. आता आवृत्तबीजींचे वर्गीकरण का व कसं केलं जातं ते पाहूया. अस्तित्वात असणाऱ्या एकूण वनस्पतींपैकी ८०% वनस्पती आवृत्तबीजी असल्यानं त्यांच्या सुसूत्र अभ्यासासाठी त्यांचे वर्गीकरण आवश्यक आहे. पुरातन काळापासून देशी विदेशी तत्वज्ञ व अभ्यासक यांनी वेगवेगळ्या वर्गीकरण पद्धती तयार केल्या/ वापरल्या. केवळ काही मुद्द्यांवर केलेले वर्गी करण ‘कृत्रिम’ तर अधिक खोलात जाऊन तौलनिक आधारावर केलेलं वर्गीकरण ‘नैसर्गि क’ समजलं जातं. नवीनतम साधनांचा वापरकरून वनस्पतींमधील नातेसंबंध उलगडणारं वर्गीकरण ‘वंशैतिहासिक’ मानलं जातं. सर्वात पुरातन वर्गी करण हे वनस्पतींच्या उपयोगांवर आधारलेलं होतं आणि म्हणून कृत्रिम होतं. त्यानंतर मात्र तौलनिक रुपिकी (मॉर्फो लॉजी) वर्गी करणाचा पाया बनली. ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ बेंथॅम आणि हूकर यांनी तयार केलेली व प्रामुख्यानं पुष्पीय रुपिकीवर बेतलेली आपली वर्गी करण पद्धत १८६२ ते १८८३ दरम्यान प्रसिद्ध केलेल्या जिनेरा प्लॅनटारमच्या तीन खंडात मांडली. यात त्यांनी सबीज वनस्पतींच्या ७५६९ प्रजातींतील ९७२०५ जातींना २०२ कुलांमध्ये वर्गीकृत केलं होतं. त्यांच्या मते ही पद्धत नैसर्गिक होती. भारतासह ब्रिटिश राष्ट्रकुलातील इतर देश अजूनही हीच पद्धत वापरतात. ही पद्धत वापरण्यास सोपी असली तरी त्यात अनेक त्रुटी देखील आहेत. या वर्गीकरण पद्धतीत उत्क्रांतीक्रम आणि वंशैति हास डावलला गेलाय. अनावृत्तबीज वनस्पतींना एकदलीय व द्विदलीय वनस्पतींच्या मध्ये ठेवलंय. एकदलीय वनस्पतींना मागास समजलं गेलंय. मुक्तप्रदली (पॉलि पेटॅली) व युक्तप्रदली (गॅमोपेटॅली) गटांनंतर परिदली (संदल/ कॅलिक्स व प्रदल/ पेटल्स ऐवजी परिदल/ पेरीअँथ असणाऱ्या) वनस्पतींना वर्गी कृत केलंय.


एंग्लर आणि प्रांटल या जर्मन वनस्पती तज्ज्ञांनी १८८६ साली प्रसिद्ध केलेल्या वनस्पतींच्या नैसर्गिक वर्गीकरण पद्धतीत त्यांच्या उत्क्रांतीच्या क्रमानुसार व नातेसंबंधांनुसार २८० कुलांमध्ये अंतर्भूत केले आहे. वनस्पतींच्या बाह्य व आंतरिक रुपिकी, कार्यपद्धती, विविध जैविक प्रक्रिया व परस्पर नातेसंबंध यावर बेतलेली ही वर्गीकरण पद्धत बहुतांशी नैसर्गिक आहे. यात अनावृत्तबीज वनस्पतींना आवृतबीज वनस्पतींपासून वेगळं केलं गेलंय. असं असूनही एकदल वनस्पतींना द्विदल वनस्पतींच्या तुलनेत मागास ठरवलंय. काही गण (ऑर्डर्स ) प्रमाणाबाहेर मोठ्या तर काही मोजक्या कुल असणाऱ्या झाल्यात. या व इतर काही त्रुटीमुळे ही वर्गी करण पद्धती सर्वमान्य होऊ शकली नाही.


हचिन्सन या ब्रिटि श वर्गीकरण कर्त्याने १९२६ व १९३४ साली प्रथम प्रसिद्ध केलेल्या ग्रंथातून आपली नैसर्गि क व वंशैतिहासिक वर्गीकरण पद्धत मांडली. परस्पर नातेसंबंध व उत्क्रांतिक्रम यानुसार आवृत्तबीज वनस्पतींची तब्बल ४११ कुले यात बनवली आहेत. या पद्धतीत आवृत्तबीज वनस्पतींची एकवांशि क उत्पत्ती झाली असल्याचं व एकदलीय वनस्पतींचा उद्गम द्विदलीय वनस्पतीपासून झाल्याचं प्रति पादन केलंय. अधि वास (हॅबिटॅट) आणि सवयी (हॅबिट्स) यांना अवास्तव महत्व देण्याने वृक्ष व वानसे यांना भिन्न कुलांत वर्गी कृत केलंय ही या पद्धतीतली सर्वा त महत्वाची त्रुटी आहे.


आवृत्तबीजींच्या उत्क्रांतीचे सम्यक ज्ञान झाल्यावर सपुष्प वनस्पतींतील एकदलीय व द्विदलीय यांच्यातील भिन्नत्व मूलभूत नसून त्यांची उत्क्रांती एकाच पूर्वजांपासून झाली असावी हे लक्षात येतं. रेण्विक विज्ञानाच्या (मॉलेक्युलर सायन्स) आधारे, तीन सरी (फरोज) अथवा रंध्रे (पोअर्स) असणारे (ट्रायकॉलपेट) परागकण ज्यांत तयार होतात ते, सुद्विदलीय (युडायकॉट्स) हे एकरंध्रीय अथवा एकसरीय (मोनोकॉलपेट) परागकण असणाऱ्या मूळ द्विदलीय व एकदलीय वनस्पतींहून प्रगत आहेत. या सुद्विदलि यांत देखील साचेबंद पुष्पीय संरचना असणारे सत्व सुद्विदलीय (कोअर युडायकॉट्स) एकदलीय, मूळ द्विदलीय व सुद्विदलीय यांच्याहून आगळे असतात. सामान्यतः परागकोश त्याच्या बुडाशी वृन्ताला जोडलेला असतो परंतु सत्व द्विदलि यांत निमुळता होत गेलेला वृंतपरागकोशाच्या पाठीमागे जोडलेला असतो. काही सुद्विदलि यांत ट्रायकॉलपेट परागकण असले तरी सत्व सुद्विदलि यांत तिन्ही सरींच्या मधोमध रंध्र असते ज्यातून पराग नलिका बाहेर येते. मूळ द्विदलीय, सुद्विदलीय, सत्व सुद्विदलीय व एकदलीय गटांमध्ये मुख्य शाखा व उपशाखा असून त्यांत विविध गण व कुले आहेत.


जगभरातील रेण्विय शास्त्रज्ञांनी सार्वमताने एक नूतन वर्गीकरण पद्धती बनवली आहे. शास्त्रज्ञांच्या या गटाचं नाव अँजियोस्पर्म फायलोजेनी ग्रुप (आवृत्तबीजी वंशैतिहास गट) असल्याने या पद्धतीला एपीजी पद्धत म्हणतात. ही पद्धत रेण्विक साम्य व भेद यांवर बेतलेली असल्यामुळे ती अत्यंत विश्वासार्ह व तंगडी आहे. या पद्धतींमध्ये सुधारणा होत एपीजी १, २, ३ व ४ बनत गेल्या आहेत. एपीजी- ४ नुसार आवृत्तबीजीं मध्ये ६४ गण आणि ४१६ कुले आहेत.

 

(लेखक मुंबईतील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक वप्राणिशास्त्र विभागप्रमुख आहेत.)




 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page