top of page


भारतीय ज्ञानपरंपरेतील सूक्ष्म विज्ञान
“अक्षय तृतीया आणि हनुमान जयंती : खगोलशास्त्र, आयुर्वेद आणि सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास” डॉ. दीपेश चिकणे भारतीय संस्कृतीतील सण हे केवळ धार्मिक श्रद्धांचे प्रतीक नसून निसर्ग, विज्ञान, आरोग्यशास्त्र आणि सामाजिक व्यवस्थेचा सखोल विचार दर्शवणारे आहेत. वैशाख महिन्यात साजरे होणारे अक्षय तृतीया आणि हनुमान जयंती हे दोन सण भारतीय ज्ञानपरंपरेतील वैज्ञानिक दृष्टीकोनाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जातात. या सणांमध्ये खगोलशास्त्र, आयुर्वेद, पर्यावरणशास्त्र, मानसशास्त्र आणि सामाजिक विज्ञान यांचा सु


गणित म्हणजे नक्की काय ?
जगदीश काबरे गणित म्हणजे नक्की काय? संख्या म्हणजे काय? आणि अनुभवाशिवाय गणित कसे उभे राहते? हे प्रश्न प्रथमदर्शनी कठीण वाटतात, पण थोडा विचार केला तर ते प्रश्न कठीण नसतात हे आपल्या लक्षात येईल. गणित म्हणजे केवळ आकड्यांच्या बेरीज-वजाबाकीचे शास्त्र नाही; तर ते त्याहून खूप व्यापक आहे. आपण म्हणतो ते ‘तीन’, ‘दहा ’, ‘शंभर’ हे आकडे स्वतः वस्तू नसतात. ‘तीन’ हा आकडा दिसत नाही; दिसतात त्या तीन वस्तू. उदा. तीन सफरचंद, सात दगड आपण त्या वस्तूंच्या मोजणीतून ‘तीन’ म्हणजे किती, ’सात’ म्हणजे कित


मंदिर: ऊर्जा,वास्तू आणि विज्ञान - दगडात साकारलेली ज्ञानपरंपरा
डॉ. उज्ज्वला खोत भारतीय मंदिर बांधकामात विज्ञान आणि खगोलशास्त्र यांचा अद्भुत संगम दिसून येतो. प्राचीन काळातील वास्तुकारांनी मंदिरांची रचना करताना सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांच्या हालचालींचा सूक्ष्म अभ्यास केला होता. अनेक मंदिरांची दिशा अशी ठरवली जाते की विशिष्ट दिवसांमध्ये, जसे संक्रांती, सूर्यकिरणे थेट गर्भगृहातील मूर्तीवर पडतात. उदाहरणार्थ, कोणार्क सूर्यमंदिर हे सूर्याच्या गतीनुसार उभारलेले असून त्याची रचना एक भव्य रथासारखी आहे. तसेच, मंदिरातील शिखरे, मंडप आणि स्तंभ यांचे प्र


प्रतिबिंब पाहे बिंबातें
विठ्ठल रायगावकर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी अध्यात्मातील विविध संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक अनेक दृष्टांत दिलेले आहेत. “प्रतिबिंब पाहे बिंबातें’’ हा असाच एक विज्ञान क्षेत्रातील दृष्टांत आहे. ह्याचा धागा पकडून आपण बिंब आणि प्रतिबिंब या शब्दांच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू या. आम्हाला लहानपणी दुसरीच्या वर्गात “आरसा हसला आरसा रडला” अशा शीर्षष्घकाचा एक छान धडा होता बालभारतीच्या पुस्तकांमध्ये. तो एक कुणीतरी मुलगा सकाळी उशिरा उठतो आणि पटपट त


नववर्षाची गुढी: सनातन भारतीय संस्कृतीतील वनस्पतीविज्ञानाची जिवंत परंपरा
डॉ. दिपेश चिकणे या लेखात गुढीपाडव्याच्या गुढीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या जैव-सांस्कृतिक आणि वैज्ञानिक पैलूंचे सखोल विश्लेषण केले आहे. आपण या लेखात पाहू शकता की नीम, आंब्याची पाने, झेंडू, ऊस आणि लाल फुले ही केवळ धार्मिक प्रतीके नसून ऋतूचक्र, पर्यावरण, सूक्ष्मजंतूनियंत्रण, कीटकप्रतिबंध आणि मानवी आरोग्याशी निगडित आहेत. आयुर्वेदीय ग्रंथांतील उल्लेख , जैवरासायनिक संयुगे (Azadirachtin, Mangiferin इ.) आणि आधुनिक संशोधन यांच्या आधारे या परंपरांचे वैज्ञानिक अधिष्ठान स्पष्ट के


मंदिर स्थापत्यकला
श्री अजय कुलकर्णी मंदिर स्थापत्य विशेषतः भारतीय मंदिर शास्त्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन या अनुषंगाने मी माझी भूमिका, अनुभव तसेच माझ्या मंदिरे व ऐतिहासिक वास्तूसंवर्धन कार्यातील जवळपास चार दशकांचा निरीक्षणाचा सारांश इथे मांडत आहे. मुळात वास्तुशास्त्र हे शुद्ध विज्ञान आहे कि केवळ कलाविष्कार यात ठळक मते आहेत व ठळक मतांतरे सुद्धा. पण माझ्या मते आधुनिक शिक्षण पद्धती विशेष करून इंग्रजी राजवटीनंतर प्रचलीत असलेल्या शिक्षण पद्धतीनुसार विविध अभ्यासक्रमांची मर्यादा निश्चित केलेली आढळते. य


बेल, धोतरा आणि शिव :संतुलनाच्या तत्त्वज्ञानाचा वैज्ञानिक वेध
डॉ. दिपेश रामदास चिकणे महाशिवरात्र हा भारतीय संस्कृतीतील केवळ धार्मिक उत्सव नसून, तो तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय दर्शविणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक संदर्भ आहे. शिवतत्त्व हे विनाशाचे नव्हे, तर रूपांतरण, संतुलन आणि चेतनेच्या उत्क्रांतीचे प्रतीक मानले जाते. या लेखात महाशिव रात्र, शिव पूजेत वा परल्या जाणाऱ्या बेल ( Aegle marmelos ) आणि धोतरा ( Datura spp.) या परस्परविरोधी वनस्पतींच्या माध्यमातून संतुलनाची संकल्पना उलगडण्यात आली आहे. बेल ही सात्त्विक शुद्धता, आ


विज्ञान शाप की वरदान -भारतीय चिंतन
सुरेश गजानन भागवत भारतीय चिंतनात विज्ञानाच्या विधायक आणि विघातक या दोन्ही बाजूंचा साकल्याने विचार झालेला दिसतो. विज्ञान व त्यावर आधारित स्थानिक आवश्यकतेनुसार तंत्रज्ञान आपल्या देशातही त्या-त्या काळात विकसित होत होते. निसर्गाचे शोषण आणि दोहन यातला संयम त्यात स्पष्ट दिसून येतो. भारतीय चिंतनात आढळून येणाऱ्या या संयमी मार्गावर प्रकाश टाकणारा हा लेख. शालेय जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान शाप की वरदान या विषयावर बोलण्याचा किंवा लिहिण्याचा प्रसंग


न चालता सूर्याचे चालणे
श्री विठ्ठल रायगावकर आपल्या सूर्यमालिकेमध्ये एक ग्रह असा आहे की जिथे सूर्य पश्चिमेला उगवतो. शुक्र ग्रह. हो. शुक्र ग्रहावर सूर्य पश्चिमेला उगवतो. पण पृथ्वीवर मात्र पूर्वेलाच उगवतो. हळूहळू वर येतो आणि पश्चिमेला मावळतो. आपण रेल्वेमधून प्रवास करतो त्यावेळेला खिडकीतून बाहेर पाहिले की झाडी मागच्या दिशेने पळताना दिसतात म्हणजे आपण पुढे जात असतो तेव्हा झाडी मागे जातात. अगदी तसंच आहे पृथ्वीच आणि सूर्याच. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकड


आकाशात कडाडणारी वीज
श्री. विठ्ठल रायगावकर पावसाळ्यात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट आपण नेहमीच बघतो. विशेषतः वळीवाच्या पावसात हे अधिक प्रमाणात दिसून येते. ही वीज म्हणजे नेमकं काय असते? ती कशी निर्माण होते? या ढगांचा, वीजांचा, गडगडाटाचा आणि कडकडाटाचा परस्परांशी काही संबंध आहे का? या वीजेत आणि आपण घरात वापरतो त्या वीजेत काही साधर्म्य हे का? आकाशात चमकणारी ही वीज संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथात कशी वर्णिली आहे हे आपण जाणून घेवू. वीजेबद्दल आपल्या मनात एक अनामिक स्वरूपाची भीती असते. बरेचस


संस्कृती आणि विज्ञान
श्री. संदिप राणे विज्ञान आणि संस्कृती हे परस्पर विरोधी असतात असा भ्रम निर्माण केला जातो. संस्कृती आणि विज्ञान सोबतच वाटचाल करीत असतात. त्यांची भूमिका परस्परांना पूरकच असायला हवी. भारताच्या भूतकाळाचा अभ्यास केल्यास, तसा विचार आपल्या पूर्वजांनी केला होता हे लक्षात येते. मनुष्य हा एक प्राणी आहे हे काही शेकडो वर्षापूर्वीच्या मानवाला ठामपणे माहीत होते तेवढं आता वाटत नाही. ते पुराव्यामध्येही सिद्ध होतं. विकासाच्या वाटेवरून चालताना निसर्ग, संस्कृती यांचा संबंध कमी कमी होत जातो. चाली


निसर्ग संवर्धनाच्या लोक परंपरा
श्री. विजय सांबरे भारतीय संस्कृतीत निसर्ग आणि मानव यांचे नाते अद्वैतात्मक आहे. निसर्गपूजक परंपरा, जैव-सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक समुदायांनी जपलेली शाश्वत संवर्धन प्रक्रिया यांचा वेध घेणारा हा लेख. सह्याद्रीपासून ते प्रवरा खोऱ्यापर्यंत, आदिवासी, शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार समाजाच्या निसर्गाशी असलेल्या परस्परसंबंधांचा अभ्यास येथे मांडलेला आहे. अशा लोककेंद्री दृष्टिकोनातून आजच्या विकासाच्या दिशेला नवसंवेदन मिळू शकते, हा संदेश देणारा अभ्यासपूर्ण लेख. अश्माचमे मृत्तिकाचमे गिरयश
bottom of page
